शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे दिली चालण्याची वार्षिक परीक्षा

By संदीप आडनाईक | Updated: December 31, 2023 18:22 IST

'रंकाळा माझा श्वास,आरोग्यासाठी चालत राहणे माझा ध्यास'च्या गजरात रंकाळा परिक्रमा.

कोल्हापूर : 'चला चालूया आरोग्यासाठी, स्वतः सदृढ राहण्यासाठी' ही नवीन वर्षाची संकल्पना घेऊन हजारो नागरिकांनी रविवारी 'रंकाळा माझा श्वास, आरोग्यासाठी चालत राहणे माझा ध्यास'च्या गजरात रंकाळा परिक्रमा पूर्ण करत चालण्याची वार्षिक परीक्षा दिली. या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते. दरवर्षी कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनतर्फे ३१ डिसेंबर रोजी चालण्याची वार्षिक परीक्षा घेण्यात येते. नऊ वर्षापूर्वी संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे यांनी नाना गवळी आणि अजित मोरे यांच्या सोबतीने सुरू केलेला हा उपक्रम सातत्याने नवव्या वर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला.

'चालूया आरोग्यासाठी' आणि 'स्वच्छ आणि सुंदर रंकाळा' ही या वर्षीची घोषणा होती. रंकाळा तलावासभोवती चालण्याच्या या परीक्षेस पहाटेची बोचरी थंडी असतानासुद्धा ३०० ते ४०० आबालवृद्धांनी पहाटे ३:३० वाजल्यापासूनच हजेरी लावत आपला सहभाग नोंदवला. पहाटे ४ वाजता कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक बाबुराव  मकोटे, अल्ट्राटेक  सिमेंटचे अविनाश जेऊरकर, संस्थेचे संचालक नाना गवळी, महिपती  संकपाळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घघाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, उपाध्यक्ष परशुराम नांदवडेकर, संस्थेचे संचालक नाना गवळी, उदय गायकवाड, राजेश पाटील, सुनील माने, अजित मोरे यांच्यासह इतरांनी रंकाळा तलावा भोवतीचे एकूण २१ किलोमिटरचे हे अंतर ३ तासात चालत पूर्ण केले. कोल्हापूर मास्टर ॲथलेटिक असोशिएशनचे सचिव पी. टी. पाटील यांनी धावत एक तास तीस मिनिटात पाच परिक्रमा पूर्ण केल्या तर संस्थेचे सचिव महिपती संकपाळ, मॅरेथॉन धावपटू उदय महाजन, शुभम पाटील यांनी धावत दोन तासांत पाच परिक्रमा पूर्ण केल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर