शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हजारो ‘आशा’ ठाण्याला जाणार, मानधन वाढीबाबतचा आदेश काढण्याची मागणी करणार 

By समीर देशपांडे | Updated: February 7, 2024 16:35 IST

परंतू सहा महिने झाले तरी अजूनही याबाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही

कोल्हापूर : गेले २५ दिवस मानधनवाढीच्या शासन आदेशासाठी संप करणाऱ्या ‘आशा’ कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी ठाण्याला जाणार आहेत. एकीकडे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच तुम्ही आम्हांला मानधन वाढवण्याची घोषणा करून संप मागे घ्यायला लावलात. त्याचा शासन आदेश काढा अशी मागणीही करणार आहेत.कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे भरमा कांबळे, जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील, राधिका घाटगे, संगीता पाटील, सारिका पाटील, विद्या जाधव, कविता पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उज्ज्वला पाटील म्हणाल्या, गेल्यावर्षी जेव्हा आम्ही मानधनवाढीसाठी आंदोलन केले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशांना ७ हजार तर गटप्रवर्तक यांना १० हजार रूपये मानधनवाढीची घोषणा केली. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतले. परंतू सहा महिने झाले तरी अजूनही याबाबतचा शासन आदेश काढण्यात आलेला नाही. हा आदेश काढावा यासह अन्य मागण्यांसाठी आम्ही गेले २५ दिवस संपावर आहोत. परंतू अजूनही आमच्या मागण्यांची दखल शासनाने घेतलेली नाही. म्हणून ठाण्याला शिंदे यांच्या वाढदिवशी धडकण्याचा निर्णय आशांनी घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार आशा कर्मचारी गुरूवारी ठाण्याला रवाना होणार आहेत. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या धडकणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे