शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

न्यायालयात अहवाल : ११ रोजी समीरला हजर करा, अन्यथा नोटीस

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याच्या सुनावणीत तपास अधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी गोपनीय तपास अहवाल सादर केला. यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ‘तपास सुरू आहे, तो किती दिवसांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्ही करू शकतो?’ अशी विचारणा केली. त्यावर चैतन्या यांनी ‘आम्हाला किती काळ लागेल, हे काही सांगता येत नाही,’ असे उत्तर दिले. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढत या कारणासाठी हा खटला प्रलंबित ठेवू शकत नाही. ११ एप्रिलच्या सुनावणीत आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात आरोप निश्चिती होईल. त्याला पुढील सुनावणीसाठी हजर न केल्यास शो कॉज नोटीस पाठविली जाईल, असे सुनावले. पानसरे खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्यासाठी सोमवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुनावणी झाली. सुरुवातीस न्यायाधीश बिले यांनी तपास अधिकारी एस. चैतन्या यांना ‘आरोपी कुठे आहे?’ अशी विचारणा केली. त्यावर चैतन्या यांनी सध्या पोलिस भरती सुरू आहे. त्यामध्ये पोलिस व्यस्त आहेत. पानसरे खटला हा संवेदनशील आहे. आरोपीच्या जिवाला धोका आहे. बंदोबस्त उपलब्ध नसल्याने त्याला हजर करता आलेले नाही. तसेच ज्येष्ठ सरकारी वकील हर्षल निंबाळकर हे वैयक्तिक कामामुळे येऊ शकलेले नाहीत; त्यामुळे ही सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती केली. त्यावर आरोपीचे वकील अ‍ॅड. एस. व्ही. पटवर्धन यांनी यापूर्वीच्या सुनावणीला न्यायालयाने समीरला हजर करण्याचे आदेश दिले होते; परंतु पोलिसांनी हजर केले नाही, हा न्यायालयाचा अवमान आहे. पोलिसांविरोधात कारवाई व्हावी, असा अर्ज दिला. त्यावर तपास अधिकारी चैतन्या यांनी पुढील तारखेला कोणतेही कारण न सांगता समीरला हजर ठेवू, असे लेखी दिले. त्यामुळे न्यायालयाने अ‍ॅड. पटवर्धन यांचा अर्ज पुढील तारखेपर्यंत स्थगित ठेवत ‘दर सुनावणीला हेच कारण असते. पुढील सुनावणीला आरोपी हजर राहिला नाही तर शो कॉज नोटीस पाठवू,’ असे सुनावले. पानसरे कुटुंबीयांचा अर्ज फेटाळला पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत दोषारोप निश्चित करू नयेत, असा अर्ज पानसरे कुटुंबीयांनी न्यायाधीश बिले यांना सोमवारी सादर केला. त्यावर अ‍ॅड. पटवर्धन यांनी आक्षेप घेत याच कारणावर गेल्या सुनावणीत अर्ज दिला होता. तो न्यायालयाने मंजूर करून वेळही दिली होती; त्यामुळे हा अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती केली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरत पानसरे कुटुंबीयांचा मुदतीचा अर्ज फेटाळून लावला.