शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी एकवटले हजारो हात

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

उत्तूरमध्ये सुंदर गल्ली स्पर्धा : विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला ग्रामस्थांचाही हातभार

रवींद्र येसादे -उत्तूर -‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीप्रमाणे ‘स्वच्छ सुंदर माझा गाव’ हे अभियान शाळकरी मुलांनी राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शाळकरी मुलांबरोबर ग्रामस्थांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन बेचाळीस गल्ल्यांची स्वच्छता केली. उत्तूर (ता. आजरा) या दहा हजार लोकवस्तीच्या गावानं जिल्ह्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला. सर्व शाळांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. ग्रामपंचायतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तीन बुधवारनंतर स्वच्छतेचा पहिला ठप्पा यशस्वी पार पडला.प्रत्येक मंगळवारी सायंकाळी विद्यार्थ्यांबरोबर पालकही आपली गल्ली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. तिसऱ्या परीक्षणात बेचाळीस गल्ल्या स्वच्छ झाल्या. परीक्षण होईपर्यंत साऱ्यांचे लक्ष स्वच्छता मोहिमेकडे होते. प्रत्येक गल्लीत वेगळेपण करण्याचा प्रयत्न केला जात होता. परीक्षण होईपर्यंत शाळकरी मुलांनी गल्लीतील मार्ग बंद केले होते. परीक्षणाबाबत पालक-विद्यार्थी यांच्यात उत्सुकता होती.परीक्षणाच्या दरम्यान स्वच्छ सुंदर परिसराबाबत घोषवाक्ये, ओला सुका कचऱ्यासाठी पेटी, वृक्षारोपण, वृत्तपत्रे, पाणपोई, अंधश्रद्धा निर्मूलन, उद्बोधनपर वाक्ये, प्लास्टिक हटाव, पक्षी वाचवण्यासाठी घरटे आदींसह गल्लीत सारवण करून रांगोळी घातली होती.प्लास्टिकमुक्तीसाठी ग्रामपंचायत आणि व्यापारी यांची बैठक घेणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचे नियोजन नाही. गटारींची अपवादात्मक गल्ल्यांनी स्वच्छता केली नाही. तेथे जनजागृती केली पाहिजे, अशा काही त्रुटीही परीक्षणांच्या वेळी निदर्शनास आणून दिल्या आहेत. या त्रुटींचेही निराकरण करण्यात येणार आहे.संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला ग्रामस्थानींही दिलेली दाद वाखाणण्यासारखी आहे. यामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला आहे.