शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची वाढीव पेन्शन लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:52 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचार्‍याना मिळणार्‍या वाढीव पेन्शनमध्ये आता प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) कार्यालयाने खोडा घातला आहे. कर्मचार्‍यानी पेन्शनची जुनी वर्गणी भरल्याशिवाय वाढीव पेन्शन द्यायला हे कार्यालय तयार नाही. पेन्शनचा हा विषय एकट्या कोल्हापूर जिल्हा बँकेपुरताच मर्यादित नसून, त्याची व्याप्ती राज्य आणि देशभर आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा बँकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची वाढीव पेन्शन लटकली‘पीएफ’ कार्यालयाचा उलटा कारभार : पेन्शनरांमधून संतप्त भावना

विश्र्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवृत्त कर्मचार्‍याना मिळणार्‍या वाढीव पेन्शनमध्ये आता प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) कार्यालयाने खोडा घातला आहे. कर्मचार्‍यानी पेन्शनची जुनी वर्गणी भरल्याशिवाय वाढीव पेन्शन द्यायला हे कार्यालय तयार नाही. पेन्शनचा हा विषय एकट्या कोल्हापूर जिल्हा बँकेपुरताच मर्यादित नसून, त्याची व्याप्ती राज्य आणि देशभर आहे.अगोदर १९९४ पासूनची ‘पीएफ’ची ४.६६ टक्के वर्गणी व त्यावरील चक्रवाढ व्याज भरल्याशिवाय पेन्शनचे दावे मंजूर करायला पीएफ आॅफिस तयार नाही. जूनमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दरमहा मिळणारी तीन हजारांची पेन्शन यापुढे तिपटीहून अधिक मिळणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु ही रक्कम अजून पदरात पडलेली नाही.

केंद्र व राज्य सरकार कर्मचारी वगळून इतर आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍याना अंशदायी पेन्शन योजना लागू असते. जिल्हा बँकेत त्यानुसार प्रत्येकी १२ टक्के कर्मचारी व बँकेचा हिस्सा भविष्यनिर्वाह निधीसाठी घेतला जात होता; परंतु त्यातील भविष्यनिर्वाह निधीमध्ये जास्त व पेन्शन योजनेकडे कमी रक्कम वर्ग केली जात होती. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीची रक्कम एकाच वेळी जास्त मिळत असे; परंतु पेन्शन मात्र कशीबशी तीन हजार रुपये मिळत होती.

ही रक्कम फारच कमी असल्याने अशा आस्थापनांतील पेन्शन वाढवावी, यासाठी दिल्लीच्या आर. सी. गुप्ता व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिचा निकाल ४ आॅक्टोबर २०१६ ला लागला. त्यानुसार पीएफ कार्यालयाने नवी नियमावली तयार केली.

कर्मचार्‍याची १२ टक्के वर्गणी बँकेने वसूल करून पीएफ कार्यालयाकडे भरली. त्यामध्ये बँकेचाही काही दोष नाही; परंतु पीएफ कार्यालयाने मात्र त्यातील ८.३३ टक्क्यांऐवजी फक्त ३.६७ टक्केच रक्कम पीएफ फंडाला घेतली आणि आता हे कार्यालय उर्वरित ४.६६ टक्के वर्गणी आणि त्यावरील १९९४ पासूनचे चक्रवाढ व्याज भरा म्हणून सांगत आहे. त्याशिवाय पेन्शनची थकीत रक्कम व वाढीव पेन्शनही द्यायला तयार नाही.

बँकेने १२ टक्के रक्कम तुमच्याकडे भरली होती तर तेव्हाच पीएफ कार्यालयाने ८.३३ टक्के पीएफ फंडाला का घेतली नाही व त्याची चक्रवाढ व्याज वसुली आता का केली जाते, अशी विचारणा पेन्शनरांकडून केली जात आहे.सर्वांनाच फटकाकोल्हापूर जिल्हा बँकेच्या ५४१ कर्मचार्‍याची पेन्शन त्यामध्ये लटकली असून, त्यांच्याशिवाय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ), भूविकास बँक, पूर्वीची मराठा बँक यांच्यासह देशभरातील तत्सम संस्थांतील हजारो कर्मचार्‍याच्या पेन्शनचा नवाच तिढा निर्माण झाला आहे.

 

पीएफ कार्यालयाच्या चुकीच्या धोरणांचा फटका निवृत्त कर्मचार्‍याना बसत आहे. पेन्शन देण्यापेक्षा ती कशी मिळूच नये, असा अनुभव या कार्यालयाकडून येत आहे. त्याविरुद्ध संघर्ष करावा लागणार आहे.- अतुल दिघे,पेन्शनर्स आंदोलनाचे राज्य नेते 

 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीbankबँकkolhapurकोल्हापूर