शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-अफवा पसरविणाऱ्यांना खावी लागणार तुरुंगाची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:46 IST

कोल्हापूर : ‘पेट्रोल पंप बंद होणार......एस.टी. बंद राहणार... कोरोना प्रतिबंध करणारी लसची निर्मिती झाली...’अशा विविध अफवा फोनवरून व सोशल ...

ठळक मुद्देअफवा पसरविणाऱ्यांना खावी लागणार तुरुंगाची हवा सोशल मीडियावरील पोस्टरवर पोलिसांचे लक्ष : ‘कोरोना’संदर्भात प्रशासन दक्ष

कोल्हापूर : ‘पेट्रोल पंप बंद होणार......एस.टी. बंद राहणार...कोरोना प्रतिबंध करणारी लसची निर्मिती झाली...’अशा विविध अफवा फोनवरून व सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत. यामुळे जनसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून, अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. अशा अफवा पसरविणाºयांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अफवांचे पेव फुटले आहे. याची प्रचिती सोमवारी सायंकाळी आली. रात्रीपासून पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे फोन व सोशल मिडीयावरुन पसरल्याने सर्व पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या.अतिउत्साही लोकांनी या अफवांना हवा देण्याचे काम केले. लोक अस्वस्थ झाले. जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचे जाहीर करावे लागले. काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांचे सिम्बॉल वापरून कोरोना संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आला.

वृत्तवाहिन्यांचा सिम्बॉल म्हटल्यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो; हा यामागील हेतू असतो. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी अशा पोस्टवर सायबर सेलचे लक्ष असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. मंगळवारी तर एस. टी. बंद राहणार असल्याची अफवा पसरली.

याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, अशा अफवांबाबत कारवाई करण्याबाबात पोलीस प्रशासनाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसी खाक्या दाखविला जाणार आहे.

यासाठी नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्यांची सोशल मीडियावरील पोस्ट तसेच अफवा पसरविण्यासाठी आलेला फोन याची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर