शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू जयंती’ला परवानगी नाकारणाऱ्यांना चोख उत्तर मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे उद्घाटन, अन्य कार्यक्रमांना परवानगी मिळते. मात्र, आम्हाला राधानगरी धरण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ...

कोल्हापूर : राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे उद्घाटन, अन्य कार्यक्रमांना परवानगी मिळते. मात्र, आम्हाला राधानगरी धरण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी मिळत नाही, हे दुर्भाग्य आहे. परवानगी नाकारण्याचे काम ज्यांच्या कोणाच्या सांगण्यावरून झाले आहे, त्यांना शाहूप्रेमी जनता विसरणार नाही. परवानगी नाकारणाऱ्यांना येत्या काळात त्याचे चोख उत्तर मिळेल, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी दिला.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आम्ही राधानगरी धरण येथे साजरी करण्याचा निर्णय घेतला. जयंतीच्या आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता याठिकाणी सोहळा साजरा करण्यास परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी तेथे बंदोबस्त लावून लोकांना अडविले, तरीही तेथे सामान्य लोक, कार्यकर्ते आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. शाहू जयंती साजरी करणे हा गुन्हा होता हे पहिल्यांदाच कळाले. पाटबंधारे विभाग सायंकाळी सहानंतरही इतक्या जागरूकपणे काम करते ते देखील समजले. मुरगूडकरांबाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, ज्यांच्या आदेशावरून पत्रक काढण्यात आले. जे स्वयंघोषित पुरोगामी आहेत आणि ज्यांनी वारंवार गोमूत्राला नावे ठेवली, त्यांना काही का असेना गोमूत्राची आठवण झाली. पत्रक काढणाऱ्यांनी त्यांच्या नेत्याला घेऊन गोमूत्र शिंपडण्याच्या उद्देशाने धरणावर जावे. त्यानिमित्त त्यांना धरण तरी पाहता येईल, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.