शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा 

By भीमगोंड देसाई | Updated: August 10, 2024 12:48 IST

विधानसभेपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा, २९ ऑगस्टला पुढील दिशा स्पष्ट करणार

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठीच्या लढयाला प्रतिसाद मिळत नाही. लोक कमी होत आहेत, काहीजण हिणवत आहेत. पण क्षेत्र कोणतेही असो, मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, सग्या सोयऱ्याच्यांची अंमलबजावणी करावी मागणीसाठी पुढील भूमिका अंतरवाली सराटीतील २९ ऑगस्टच्या मेळाव्यात जाहीर करू, असे सूचक विधानही त्यांनी केले.जरांगे- पाटील काल, शुक्रवारपासून (दि.९) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज, दौऱ्याच्या सांगताप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जरांगे- पाटील म्हणाले, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्यांमध्ये निष्ठा ठासून भरली आहे. त्यामुळे मी दहा लोक असो किंवा दहा लाख मी तिथे जातोच. पूर, केशवराव भोसले नाट्यग्रह जळीत प्रकरण अशा विविध कारणांमुळे कोल्हापूरच्या दौऱ्यात मराठा कमी होते. पण माझ्या सभेला उपस्थित होते, त्यापेक्षा अधिक लोक मला प्रत्यक्ष भेटून गेले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा घेवून कोल्हापुरातही मराठ्यांची ताकद दाखवून देणार आहे.

..यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर मराठा आणि कुणबी एकच आहेत. पण राजकारणी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहेत. रक्तसंबंध आणि सगेसोयरे यामध्ये मोठा फरक आहे. रक्तसंबंधात मराठयांमध्ये लग्न होत नाहीत. सग्या सोयऱ्यामध्ये होतात. सग्यासोयऱ्यामध्ये कागदोपत्री पुरावा नसलेल्या मराठ्यांनाही कुणबीचा दाखला मिळणार आहे. हे सरकारलाही माहित आहे. यामुळे सरकार आता फुल्ल अडचणीत आले आहे. म्हणून काही लोकांना पुढे करून सगेसोयरे आणि रक्तसंबंध एकच आहे, असा समज पसरवत आहे. यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील