शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

कोल्हापूर राज्यात तृतीय

By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST

टक्का वाढला : बारावीचा विभागात उच्चांकी निकाल; मुलींची आघाडी कायम

कोल्हापूर : करिअर निश्चितीतील महत्त्वाचा टप्पा असलेला बारावीचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९२.१३ टक्के लागला. कोल्हापूर विभागात ९२.६४ टक्क्यांसह सातारा जिल्हा अव्वल ठरला. सांगलीने ९२.२८ टक्क्यांसह द्वितीय आणि गेल्यावर्षी विभागात प्रथम असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची घसरण होऊन ९१.६४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोल्हापूर विभागाच्या निकालात ०.५९ टक्के वाढ झाली आहे. टक्का वाढूनही विभाग राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी बुधवारी दुपारी एक वाजता येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी शिक्षणाधिकारी डी. बी. कुलाल, सहसचिव पी. डी. भंडारे, सहाय्यक सचिव बी. एस. रोटे, आदी उपस्थित होते.कोल्हापूर विभागातून ७०२ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ६ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६४ हजार ५३० मुले, तर ५१ हजार २०७ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७ हजार ३३४ असून, त्यांचे प्रमाण ८८.८५ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९ हजार २९७ असून, त्यांचे प्रमाण ९६.२७ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ७.४२ टक्के इतके अधिक आहे. सलग चौथ्यावर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. सातारा जिल्ह्यातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५ हजार ९९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.६४ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील २२८ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३२ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.२८ टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २५७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ६४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५७ हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८५ टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात गुरुवारी (दि. ४ जून) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. (प्रतिनिधी)