शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांच्या प्रतिसादात राज्य नाट्य महोत्सवाची तिसरी घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:46 IST

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर्वणी न दवडता कोल्हापूरकरांनी हाऊसफुल्ल गर्दी करीत या नाट्यकृतीला दाद दिली. पहिल्या दिवशी फोंडा येथील हंस संगीत नाट्यमंडळाने ‘अव्याहत’ हे नाटक सादर केले.

ठळक मुद्देरसिकांच्या प्रतिसादात राज्य नाट्य महोत्सवाची तिसरी घंटा‘अव्याहत’ नाटकाचे सादरीकरण

कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर्वणी न दवडता कोल्हापूरकरांनी हाऊसफुल्ल गर्दी करीत या नाट्यकृतीला दाद दिली. पहिल्या दिवशी फोंडा येथील हंस संगीत नाट्यमंडळाने ‘अव्याहत’ हे नाटक सादर केले.केशवराव भोसले नाट्यगृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालक सुनीता अस्वले, महापौर सरिता मोरे, अनिरुद्ध अष्टपुत्रे व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अस्वले यांनी रसिकांपर्यंत उत्तमोत्तम नाटके पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दरम्यान, डॉ. प्रवीण हेंद्रे, ज्येष्ठ रंगकर्मी वैशाली राजशेखर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, पत्रकार उदय कुलकर्णी, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, छायाचित्रकार अनिल वेल्हाळ; तसेच नाटकाचे दिग्दर्शक रोहन नाईक व व्यवस्थापक मंदार जोग यांचा विशेष सत्कार करण्यात आला.दर्जेदार नाट्यकृतींची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात नाट्यकलेला उत्तेजन देण्यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक, संगीत नाटक, हिंदी नाटक, बालनाट्य अशा विविध प्रकारांतील राज्य नाट्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या नाटकांचा महोत्सव पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानेही उसंत घेतली आहे. ही संधी साधून नाट्यरसिकांनी प्रयोगास उत्स्फूर्त हजेरी लावली. ‘अव्याहत’ हे नाटक बौद्ध साधूंच्या विश्वाचा वेध घेते. ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’चे प्रशांत जोशी, मिलिंद अष्टेकर यांनी संयोजन केले.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर