शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

अधिकाऱ्यांच्या गाडीवर मृत मासे टाकले

By admin | Updated: March 7, 2015 01:02 IST

पंचगंगा प्रदूषणप्रश्न : शिरोळ बंधाऱ्यावर आंदोलक संतप्त; मंगळवारी इचलकरंजीत बैठक

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी शिरोळ तालुक्यातून नागरिकांच्या संतप्त भावना उमटल्या. पाहणी करण्यास आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांना संतप्त नागरिकांनी शिरोळ बंधाऱ्यावर पाण्यात उतरूनच पाणी पहावे यासाठी नदीपात्रात ओढले. यावेळी अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात झोंबाझोंबी झाली. अखेर अधिकाऱ्यांनी पाण्यात उतरून प्रदूषित पाण्याला कारणीभूत असणाऱ्या घटकावर महानगरपालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांची मंगळवारी (दि. १०) बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. पंचगंगा नदीमध्ये महानगरपालिका, जयंती नाल्याचे सांडपाणी, इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त फेस व उग्रवास येत आहे. परिणामी नदीतील मासे मरत असल्याने ‘लोकमत’मधून ‘पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी’ या मथळ्याखाली शुक्रवारी (दि. ६) च्या अंकात पंचगंगेचे वास्तव व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मांडण्यात आला होता. या वृत्तामुळे शिरोळ तालुक्यातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता. वृत्तामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी होळकर नदीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी येणार असल्याची माहिती या प्रदूषणप्रश्नी आवाज उठविणारे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू बरगाले यांना मिळाली होती. बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते. दुपारी दोनच्या सुमारास उपप्रादेशिक अधिकारी होळकर, क्षेत्रअधिकारी राजेश आवटी, केंदुळे आदी आले. अधिकारी येताच संतप्त आंदोलनकर्ते व नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत प्रदूषण करणाऱ्या कारखानदाराबरोबर साटेलोटे असल्याचा आरोपही केला. अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यावर राहून पाहणी व पंचनामा करीत असल्याने ‘आम्ही हेच पाणी पितो, तुम्ही पाणी पिऊ नका, किमान पाण्यात उतरल्यानंतर तर पाण्याचा अनुभव घ्या’, असा हट्ट करत आंदोलनकर्त्यांनी होळकर यांना पाण्यात ओढण्यात आले. उपप्रादेशिक अधिकारी होळकर यांनी संयम राखत पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या साखर कारखाने, नगरपालिका, महानगरपालिका व औद्योगिक कारखान्यांना दंडात्मक कारवाई केल्याचे सांगितले. मंगळवारी (दि. १०) बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. यावेळी बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, बंडू बरगाले, शहाजी गावडे, प्रकाश माने, प्रदीप मगदूम, अंकुश माने, सागर पाटील, शिवाजी माने, सतीश माने, बाबासो मालगावे यांच्यासह शिरढोण, जयसिंगपूर, शिरोळ येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.