शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

‘त्यांना’ हवीय मायेची ऊब

By admin | Updated: November 14, 2014 23:57 IST

हाक कोल्हापूरकरांना : झोपडपट्टी, वसाहतींमध्ये सुमारे अडीच हजार लहान मुले उघड्यावर

संतोष मिठारी -कोल्हापूर -पत्रे अथवा ठिगळे लावून जोडलेल्या ताडपत्रींचा आडोसा असलेला निवारा, त्याच ठिकाणी पसरलेली अस्वच्छता, अशा परिस्थितीत जगण्याचे स्वप्न घेऊन वाढणाऱ्या सुमारे अडीच हजार लहान मुला-मुलींना थंडीने कुडकुडत कशीबशी रात्र काढावी लागत आहे. भंगार, कचरा गोळा करून कसेबसे पोट भरणाऱ्या त्यांच्या पालकांना इच्छा असूनही ऊबदार तर लांबच; पण अंगभर कपडे मुलांना घेणे शक्य नाही. कोल्हापुरातील झोपडपट्टी, वसाहतींमधील हे चित्र आहे. कोणतेही क्षेत्र असो, त्यातील मदतीसाठी साद दिल्यानंतर त्याला भरूभरून प्रतिसाद देण्यात कोल्हापूरकर कधीच मागे राहिलेले नाहीत. आपली जुनी कपडे, स्वेटर्स देऊन कोल्हापूरकरांनी या चिमुकल्यांना मायेसह माणुसकीची ऊब देण्याची गरज आहे. ताडपत्री, तट्टे अथवा पत्र्यांच्या आधाराने दाटीवाटी उभारलेली झोपड्यावजा घरे, तुंबलेल्या गटर्स आणि रस्त्यांवरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी अशा स्वरूपातील अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य अशा परिसरात मळकट-कळकट झालेली कपडे घालून फिरताना लहान मुले-मुली दिसतात. त्यातील अनेकांच्या अंगावर नुसताच शर्ट नाही, तर चड्डी. दिवसभर अशाच अवस्थेत सगळ्या वस्तीभर हिंडत-खेळत ही चिमुकले फिरतात. सकाळपासून राबून सायंकाळी घरी आलेली आई, वडील अथवा आजींने केलेले चार घास खाल्यानंतर ही चिमुकले शेणाने सारवलेली, तुटक्या-फुटक्याफरश्या बसविलेल्या नाही, तर कागदी पुठ्ठे, बॅनर्स पसरलेल्या जमिनीवर झोपतात. वाढणाऱ्या रात्रीत अंगाला झोंबणाऱ्या थंडीची भर पडते आणि कुडकुडत या चिमुकल्यांची कशीबशी सकाळ उगवते. वाढलेल्या थंडीत आई, बाबा अथवा आजीला बिलगून ती उबीचा शोध घेतात; पण पोटाला चार घास मिळावेत म्हणून कसरत करावी लागणाऱ्या आई-वडिलांना इच्छा असूनही आपल्या मुलांना अंगभर आणि ऊबदार कपडे देणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. ऊस तोडणीसाठी मराठवाडा, विदर्भातून आलेल्या काही टोळ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाल बसवून वस्त्या बनविल्या आहेत. या वस्त्यांवरील चिमुकल्यांची देखील अशीच अवस्था आहे. शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अशी उघड्यावर, अर्ध्या कपड्यांमध्ये राहणारी सुमारे अडीच हजार मुले-मुली आढळून आल्या आहेत. त्यांना आपआपल्या परीने मदत करून कोल्हापूरकरांनी माणुसकीची ऊब देण्याची गरज आहे.जुनी कपडे,ब्लँकेट देऊन करा मदतआपल्या घरातील अडगळीमध्ये पडलेली, वापरात नसलेली लहान मुलांची कपडे अथवा ब्लँकेट, चादर, गोधडी स्वच्छ धुऊन अशा झोपडपट्टी, वसाहतींमधील चिमुकल्यांची कडक थंडीतील रात्र सुसह्य करा. समाजातील या गरीब, वंचित स्थितीतील चिमुकल्यांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कसं-बसं पोट भरतोय; चांगली कपडे तर लांबचभंगार गोळा करणाऱ्या यादवनगर वसाहतीतील ५२ वर्षीय मीराबाई चौगुले सांगतात की, दिवसभर राबल्यानंतर पोट भरण्यासाठी चार पैसे मिळतात. त्यातून नातीचादेखील सांभाळ करते. घरही साधेसुधेच आहे. फारसे पैसेच नसल्याने इच्छा असूनही चांगले कपडे नातीला देणे शक्य होत नाही. माझ्यासारखीच वस्तीतील अनेकांची स्थिती आहे. संभाजीनगर येथे स्टोव्ह रिपेरिंगचा व्यवसाय करणाऱ्या कमल शिंदे यादेखील नातीला सांभाळतात. त्या म्हणाल्या, शहरातील विविध झोपडपट्टी, वसाहतींमधील प्रत्येक घराची एक वेगळीच कथा आहे. कुणाची आई आजारी, कुणाचा बाबा व्यसनाधीन, कुणाला आई-वडीलच नाहीत. अशा स्थितीत आजी, मावशी, आई या भंगार अथवा कचरा गोळा करून, धुणी-भांडी करून आपला आणि त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह करतात. इथं पोट भरतानाच दिवसभर वणवण करावी लागते. मग, त्यांना चांगले आणि ऊबदार कपडे कुठून मिळणार. त्यामुळे अनेक मुलांना अशी थंडीने कुडकुडतच रात्र काढावी लागते. या समाजातील गरीब आणि वंचितांची परिस्थितीची जाणीव करून देणारी प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे आहेत.याठिकाणी आहेमदतीची गरजयादवनगर-डवरी वसाहतविचारेमाळसंभाजीनगर पेट्रोलपंपामागील वसाहतवारे वसाहतसागरमाळ-दौलतनगरमुडशिंगीच्या माळावरील झोपडपट्टीराजेंद्रनगरटिंबर मार्केट-गंजीगल्ली