शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भविष्यात आयलीग स्पर्धेतही महिला संघ दिसेल : मधुरिमाराजे ,कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:12 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल,

ठळक मुद्दे‘खेलोगे तो खिलोगे’ या योजनेतून कोल्हापूरच्या प्रणाली चव्हाण हिला केवळ फुटबॉल खेळण्यासाठीची राष्ट्रीय स्तरावरील ५० हजारांची शिष्यवृत्ती मिळाली मुलींना फुटबॉलमुळे रेल्वे, पोलीस, लष्कर, आदींसह केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीच्याही संधी उपलब्ध

कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य असल्याने येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत कोल्हापूरचाही संघ दिसेल, असा विश्वास वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

आज, शनिवारपासून शाहू स्टेडियमवर होणाºया इंडियन वुमेन्स लीग पात्रता फेरीच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या.संस्थानकाळापासून सुरू असणाºया फुटबॉलमध्ये १९९५ पासून महिला फुटबॉलचीही बीजे कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी रोवली. त्यावेळी दोन संघ होते. त्यांचे आता १९ संघ निर्माण झाले आहेत.

त्यातून मृदल शिंदे, ऐश्वर्या हवालदार, सुचेता पाटील, पृथ्वी गायकवाड, प्रणाली चव्हाण, रचना पाटील, प्रतीक्षा मिठारी, आदी राष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत. महिलांची संघनिर्मिती व्हावी, याकरिता कोल्हापुरातील आघाडीच्या फुटबॉल क्लब, तालीम संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे. याकरिता मुलींचाही खुला संघ निर्माण व्हावा.

जेणेकरून कोल्हापुरातूनही राष्ट्रीय पातळीवरील ‘आयलीग’सारख्या स्पर्धेत या मुली कोल्हापूरचे नाव करतील. ज्याप्रमाणे के. एस. ए. वरिष्ठ लीग ए ते बी, सी, डी, ई अशा पातळ्यांवर संघनोंदणी करतात, त्याप्रमाणे मुलींच्याही संघांची नोंदणी के. एस. ए. च्या माध्यमातून व्हावी. जेणेकरून ‘विफा’ व्हाया ‘आॅल इंडिया फुटबॉल महासंघा’कडे केवळ ‘कोल्हापूरचे संघ’ म्हणून नोंदणी होईल आणि आपल्या कोल्हापूरच्या मुली देशभरात या फुटबॉलनगरीचा डंका वाजवतील.

मुलींना फुटबॉलमुळे रेल्वे, पोलीस, लष्कर, आदींसह केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीच्याही संधी उपलब्ध आहेत. येत्या काळात कोल्हापुरात ‘एआयएफएफ’च्या माध्यमातून ‘बेबी लीग’सारख्या स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत. त्यातून वय वर्षे ८ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या या स्पर्धा होतील. त्याकरिता कोल्हापूरचाही संघ यात असेल.

कोल्हापूरच्या अनेक मुलींनी फुटबॉलच्या तंत्रशुद्ध खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच ‘विफा’च्या ग्रासरूटमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार मृदल, ऐश्वर्या या पंच म्हणूनही काम करीत आहेत. केवळ कोल्हापुरात नोंदणीकृत संघ नसल्याने आपल्या पाच मुली बडोदा संघातून खेळत आहेत. विशेष म्हणजे १९ शाळांच्या संघातीलच मुली पुढे विद्यापीठ आणि खुल्या चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्पर्धा गाजवित आहेत.

‘खेलोगे तो खिलोगे’ या योजनेतून कोल्हापूरच्या प्रणाली चव्हाण हिला केवळ फुटबॉल खेळण्यासाठीची राष्ट्रीय स्तरावरील ५० हजारांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यासह कोल्हापूरच्या अनिकेत जाधवने तर युवा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातून आघाडीचे स्थान पटकावून या नगरीचा डंका संपूर्ण देशासह परदेशांतही केला आहे. भारतीय महिला व पुरुष फुटबॉल संघात मणिपूरच्या मुली व मुलांचा भरणा जवळजवळ संघांच्या निम्मा असतो. त्याला कारण म्हणजे तेथे कोल्हापूरसारखा घराघरांत फुटबॉल आहे. फरक फक्त एकच आहे की, तेथील पालक, संस्थांनी आपल्या मुलींकरिता संघनोंदणी केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्याही तालीम, फुटबॉल क्लबनी जर अशी संघनोंदणी केली, तर भविष्यात कोल्हापूरच्या महिलांचीही टीम इंडियन आयलीग फुटबॉल स्पर्धेत निश्चित दिसेल.आघाडीच्या क्लबनी पुढाकार घ्यावासंस्थानकाळापासून सुरू असणाºया फुटबॉलमध्ये १९९५ पासून महिला फुटबॉलचीही बीजे कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी रोवली. त्यावेळी दोन संघ होते. त्यांचे आता १९ संघ निर्माण झाले आहेत. त्यातून मृदल शिंदे, ऐश्वर्या हवालदार, सुचेता पाटील, पृथ्वी गायकवाड, प्रणाली चव्हाण, रचना पाटील, प्रतीक्षा मिठारी, आदी राष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत. महिलांची संघनिर्मिती व्हावी, याकरिता कोल्हापुरातील आघाडीच्या फुटबॉल क्लब, तालीम संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल