शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

चंदगडमध्ये पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

By admin | Updated: September 3, 2016 00:59 IST

मतदारसंघ पुनर्रचनेचा परिणाम : अनेकांनी गुडघ्याला बांधले बाशिंग; भरमूअण्णांना बालेकिल्ल्यातच धक्का

नंदकुमार ढेरे-- चंदगड --जि. प. व पं. स.च्या निवडणुका लढविण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना झाल्यामुळे अनेकजणांच्या इच्छेवर पाणी पडले आहे. इच्छा पूर्ण होतात की त्यांच्या इच्छेवरही पाणी पडते हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.चंदगड तालुक्यात जि.प. व. पं.स.वर राष्ट्रीय काँगे्रसचे वर्चस्व आहे. नुकतेच माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे झालेले निधन व घटलेला हलकर्णी जि.प. मतदारसंघ, दौलत सुरू करण्यात अप्पी पाटील यांनी घेतलेला पुढाकार यामुळे येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीची समीकरणेच बदलली आहेत.चंदगड तालुक्यात हलकर्णी, तुर्केवाडी, अडकूर, चंदगड, कुदनूर हे जि.प.चे ५, तर हलकर्णी, मागणाव, तुडये, तुर्केवाडी, नांदवडे, चंदगड, अडकूर, कानूर, कुदनूर व कोवाड हे पं.स.चे १० मतदारसंघ होेते. पण, निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणानुसार हलकर्णी हा जि. प., तर माणगाव व हलकर्णी हे पं.स.चे दोन मतदार कमी झाले आहेत. आता नव्याने चंदगड, कुदनूर, तुडये, माणगाव हे जि.प.चे चार, तर अडकूर, चंदगड, माणगाव, हेरे, कुदनूर, कालकुंद्री, तुडये व हलकर्णी असे आठ नवीन मतदारसंघ उदयास आले आहेत. त्यामुळे हलकर्णी जि. प. मतदारसंघात इच्छुक असलेल्या आता हेरे जि.प. मतदारसंघासाठी नव्याने व्यूहरचना करावी लागणार आहे.हलकर्णी मतदारसंघ हा माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ घटल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. जि.प.व पं.स.च्या गत निवडणुकीत राष्ट्रीय काँगे्रसचे ज्योती दीपक पाटील (हलकर्णी), महेश पाटील (तुर्केवाडी), तात्यासाहेब देसाई (अडकूर), राजेंद्र परीट (चंदगड) हे जि. प.चे ४ व विद्यमान उपसभापती शांताराम पाटील (हलकर्णी), अनिल सुरुतकर (माणगाव), सभापती ज्योती पाटील (तुर्केवाडी), निंगो गुरव (तुडये), तुळसा तरवाळ (चंदगड), बबन देसाई (अडकूर) हे पं.स.चे ६ उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादीचे जि.प.च्या सुजाता पाटील (कुदनूर) व पं.स.चे हसिना नाईकवाडी (नांदवडे), अनुराधा पाटील (कानूर), नंदिनी पाटील (कोवाड) व कल्लाप्पा नाईक (कुदनूर) हे निवडून आले होते. जि.प.चे माजी अध्यक्ष भरमूअण्णा पाटील (बसर्गे), शिक्षण व बांधकाम समिती सभापतिपदी भरमाण्णा गावडा (हलकर्णी), महेश पाटील (म्हाळेवाडी), महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी देवयानी सावंत-भोसले, पुष्पमाला जाधव (कुदनूर), विद्यमान सभापती ज्योती पाटील यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.शंकुतला देसाई, शिवाजी सावंत, मल्लिकार्जुन मुगेरी, बी. डी. पाटील, संताजी जाधव, कै. रामचंद्र कुंभार, कै. शंकर घोरपडे, शंकर आंबेवाडकर, बाळासाहेब घोडके, आदींनी सदस्य म्हणून काम केले आहे. गत विधानसभा निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हाताऐवजी सेनेच्या धनुष्यावर निवडणूक लढवली होती. थोडक्यात भरमूअण्णा पाटील व कै.नरसिंगराव पाटील यांनी काँगे्रसच्या झेंड्याखाली गत जि.प. व पं.स. निवडणुकीत यश खेचून आणले होते. नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेत प्रवेश केल्याने काहीअंशी चंदगड तालुक्यातील काँगे्रसला मतामध्ये फरक जाणवणार आहे.काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी भरमूअण्णा पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, प्रदेश सदस्य सुरेशराव चव्हाण-पाटील आदी कार्यकर्त्यांवर आहे. तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षालाही रिचार्ज व्हावे लागणार आहे. भरमूअण्णा, नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांचे नाराज कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे समीकरण होते. त्यामध्ये आता नव्याने भर पडली असून, तीनही पाटलांचे अधिक राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्ते म्हणजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी ऊर्फ विनायक पाटील यांचा गट असे चित्र सध्या तालुक्यात आहे. गोपाळराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यात भाजपला बळकटी येत आहे. अप्पी यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला दौलत कारखाना सुरू करण्यास प्रारंभ केल्याने तालुक्यातील जनताही त्यांच्याकडे आशेने बघत आहे. पण, शेतकऱ्यांची मागील देणी देऊन इतर कारखान्यांच्या बरोबरीने सोयी सवलती दिल्या तरच शेतकरी त्यांच्याबरोबर राहतील, हेही त्यांनी विसरून चालणार नाही.तालुक्यात पक्षापेक्षा गटाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गटाची मते हीच पक्षाची मते आहेत. गत विधानसभा निवडणूक कै. नरसिंगराव पाटील यांनी जरी शिवसेनेतून लढवली तरी त्यांचे पुत्र राजेश पाटील हे काँगे्रसमधून ‘गोकुळ’वर संचालक, महेश पाटील हे काँगे्रसचे जि. प. सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना काँगे्रसलाच मदत करावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँगे्रसची ताकद पहिल्या इतकीच राहणार आहे. भाजपच्या गोटतून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे गोपाळराव पाटील यांना पाठबळ देत असल्याने भाजपही तालुक्यात आपली पाळेमुळे खोलवर रूजवत आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर यांच्या सहकार्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थापन केलेल्या शाखा यावेळेला प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, राजू रेडेकर, अशोक मनवाडकर यांना नक्कीच साथ देतील.बदललेले मतदारसंघ, गोपाळरावांचा भाजप प्रवेश, अप्पी पाटील यांचे दौलत सुरू करण्यास झालेले प्रयत्न, माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे निधन यामुळे जि.प. व पं.स. निवडणूक सर्वार्थाने काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेला आव्हान देणारी आहे.इच्छुकांना दुसऱ्या मतदारसंघाचा आधारसंभाव्य चंदगड नगरपंचायत करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड नगरपंचायतीकरिता होणारे मतदान जि.प. व. पं.स.करिता होणार नाही. त्यामुळे जि.प. व पं.स.चे मतदार घटवून काही गावे बदलून नवीन मतदारसंघ अस्तित्वात आणले आहेत. त्यामुळे अगोदरच फिल्डिंग लावलेल्या इच्छुक उमेदवारांना दुसऱ्या मतदारसंघाचा आधार घ्यावा लागणार आहे.माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या निधनानंतर दौलत व जिल्हा बँक यांच्या कराराला विरोध करण्यासाठी तुर्केवाडी येथे जमलेल्या सर्वपक्षीय बैठकीनुसार काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय काँगे्रस, भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध अप्पी पाटील युवा मंच अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.इच्छुक उमेदवार : चंदगडमधून : उपसरपंच सचिन बल्लाळ, तात्यासाहेब देसाई, राजेंद्र परीट, आण्णा वाटंगी, बबन देसाई. कुदनूरमधून : कल्लाप्पा भोगण, सुरेश घाटगे, शंकर आंबेवाडकर, राजू रेडेकर, एम. जे. पाटील, सुजाता पाटील, अजित व्हन्याळकर. तुडयेमधून : बी. डी. पाटील, विद्यमान उपसभापती शांताराम पाटील, निंगू गुरव, बाळू चौगुले, प्रभाकर खांडेकर, नारायण पाटील. माणगाव जि. प. : विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, शामराव बेनके, महादेव प्रसादे, अ‍ॅड. संतोष मळवीकर, नितीन पाटील, उदयकुमार देशपांडे, आर. जी. पाटील, शिवाजी सावंत, निंगाप्पा आवडण, संजय पाटील.