काेल्हापूर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ८०वा वाढदिवस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण राज्यभर केले जाणार आहे.
शरद पवार यांचे वाढदिवस दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतींनी साजरे केले जातात. यापूर्वी स्वाभिमानी सप्ताहासह अनेक उपक्रम राबविले गेले. यावर्षी ८० व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातच मुंबईमध्ये होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.
वाढदिवसाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी शहर कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. शहर सरचिटणीस सुनील देसाई यांनी स्वागत केले. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळाेखे यांनी प्रास्ताविक केले. आदिल फरास, निरंजन कदम, रमेश पोवार, रामराजे बदाले, सुहास साळोखे, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण, प्रल्हाद उगवे, अनिल घाटगे, संभाजी देवणे, परी पन्हाळकर, सुनीता राऊत, आदी यावेळी उपस्थित होते.
फोटो ओळी :
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी कोल्हापूर शहर कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेंद्र चव्हाण, अनिल साळोखे, आर. के. पोवार, सुनील देसाई, आदिल फरास, जहिदा मुजावर, आदी उपस्थित होते. (फोटो-०६१२२०२०-कोल-एनसीपी)
- राजाराम लोंढे