शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:20 IST

कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देआरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मागणी

कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते; पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, तेच चौकशी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबाहेरील समितीला चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेने व्हीटीएम किट्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, थर्मल स्कॅनर यांसह अनेक सुमारे २८ वस्तूंची खरेदी केली. या खरेदीचे दर आणि वस्तूंची संख्या यांवर नजर टाकली तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

या खरेदीसाठी वस्तूंचे उत्पादन मूल्य, बाजारभाव, उपलब्ध दरकरार, पुरवठादार कंपन्या यांचा अभ्यास जिल्हा परिषदेकडून झाला होता की नाही, हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे. बाजारात ४० रुपयांना मिळणारा मास्क जिल्हा परिषदेला २५० रुपयांना देण्यात आला, असा अजब कारभार झाला आहे. पुरवठादाराच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.७०० बेड वाढविणारविभागीय आयुक्त राव व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांमध्ये ७०० बेड वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील १०-१२ दिवसांत ते कार्यान्वित होतील. सध्याच्या या गंभीर स्थितीत प्रशासनाला अनेक पातळ्यांवर लढावे लागत आहे. त्यात मानवी प्रवृत्तीला तोंड देणे जास्त कठीण आहे. या सगळ्यांत खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होत असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर