शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रिस्क’ला मुदतवाढ देण्याचा प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

गडहिंग्लज : ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र शासनाला दिले आहे, कारखान्याला दिलेले नाही. कंपनीबरोबर झालेल्या कराराची मुदत अजून ...

गडहिंग्लज :

ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र शासनाला दिले आहे, कारखान्याला दिलेले नाही. कंपनीबरोबर झालेल्या कराराची मुदत अजून दोन वर्षे शिल्लक आहे. त्यामुळे कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रश्नच नाही; परंतु कंपनी जर कारखाना सोडणारच असेल तर पुढील नियोजन संचालक मंडळ करेल, अशी माहिती अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आज (मंगळवारी) दिली.

येथील स्वयंवर सांस्कृतिक भवनात झालेल्या कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सुभाष पाटील (कडगाव) यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सेवानिवृत्त कामगारांच्या देणीसंदर्भात औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाचा निकाल कारखाना व कंपनी दोघांनाही बंधनकारक राहील, असे उत्तर त्यांनी चंद्रकांत बंदीच्या प्रश्नाला दिले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

२०१३-१४ पासून कारखाना सहयोग तत्त्वावर ‘ब्रिस्क’ला चालवायला दिला आहे. त्यामुळे मशिनरी, डिस्टिलरी, कामगार कॉलनी इत्यादींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची जबाबदारीदेखील कंपनीचीच आहे, असे त्यांनी शिवाजी खोत यांच्या प्रश्नावरील उत्तरात स्पष्ट केले.

संचालक दीपक जाधव यांनी स्वागत केले. कारखान्याचे वित्त व्यवस्थापक बापूसाहेब रेडेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. संचालक सतीश पाटील यांनी आभार मानले.

--------------------------------------

*

टनाला २१.८३ जादा दर

२०२०-२१ गळीत हंगामात ब्रिस्क कंपनीने ३ लाख ३९ हजार मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ६ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. उसाला प्रति टन २८०० प्रमाणे म्हणजेच प्रति टन २१ रुपये ८३ पैसे इतका जादा दर दिला आहे, असेही अध्यक्ष शिंदेंनी सांगितले.

--------------------------------------

* फोटो ओळी : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक बाळासाहेब मोरे, प्रकाश पताडे, अमर चव्हाण, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, अनंत कुलकर्णी, क्रांतीदेवी कुराडे, जयश्री पाटील, सचिव मनोहर मगदूम उपस्थित होते.

क्रमांक : ३००३२०१९-गड-०४