शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

पाणी, पार्किंग समस्यांवर ‘उत्तर’ नाही

By admin | Updated: December 26, 2014 23:44 IST

तत्पर नगरसेविका : विकसित होत असलेल्या भागात रस्त्यांचा प्रश्न; वाहनतळाची मागणी जोरात

कोल्हापूर : अवघी पाच हजारांची लोकसंख्या; पण तब्बल अडीच किलोमीटर परिसरात विभागलेला विरळ लोकवस्तीचा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक १९ शाहूपुरी (उत्तर) ओळखला जातो. व्यापारी पेठ, मुख्य रस्ते, दरवर्षी नव्याने होणारी बांधकामे, अपार्टमेंट, सतत भौतिक घडामोडींत असणाऱ्या या प्रभागात पाणी, रस्ते व पार्किंगची मोठी समस्या आहे. नगरसेविका मृदुला पुरेकर व माजी नगरसेवक रमेश पुरेकर सातत्याने लोकसंपर्कातून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी पार्किंग व पाण्याच्या समस्येवर ‘उत्तर’ शोधण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सीपीआर चौकापासून या प्रभागास सुरुवात होते. सीपीआर ते संपूर्ण स्टेशन रोडवरून ट्रेड सेंटर, कोरगावकर कंपौंड व महावीर कॉलेज चौक, वंडर इलेव्हन ते सीपीआर चौक असा स्टेशन रोडच्या उत्तरेचा भाग व्यापलेला असा हा प्रभाग आहे. प्रभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नव्या इमारती व बांधकामे होत असतात. नव्याने वसणाऱ्या सोसायट्या व अपार्टमेंट यांना रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा पुरविण्यासह जुन्या मतदारांकडे लक्ष देण्याची कसरत पुरेकर यांना करावी लागते.संपूर्ण प्रभागास कसबा बावडा, कावळा नाका, ताराबाई पार्क व कोकणे मठ या चार पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होतो. चार ठिकाणांहून कमी-अधिक दाबाने अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने संपूर्ण प्रभागात पाण्याची मोठी समस्या आहे. नियमित व वेळेत पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. संपूर्ण स्टेशन रोडवर पार्किंगची व्यवस्था नाही. यामुळे बहुतांश वाहने रस्त्यांवरच थांबून असतात. नव्याने होणाऱ्या अपार्टमेंट व इमारतींच्या पार्किंगकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.महावीर कॉलेज रस्त्यावरील वंडर इलेव्हनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी नव्याने उच्चभू्र वस्ती होत असून येथे रस्ते व पथदिव्यांचा अभाव असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मृदुला पुरेकर यांनी रस्तेबांधणीसह जुन्या रस्त्यांच्या डागडुजीकडे लक्ष दिल्याचे दिसते. नव्या कॉलनीत वीज, पाणी व रस्तेबांधणीची योजना आखली आहे. महावीर उद्यानामध्ये मिनी ट्रेन सुरू केली असून, वॉकिंग ट्रॅकचा प्रश्न मार्गी लावला. गेली तीन वर्षे मिनी ट्रेन सुरू असून, लहान मुलांना मोफत सफर घडविली जाते. कुटुंबासह विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या महावीर उद्यानाकडे पुरेकर जातीनिशी लक्ष देत असल्याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त आहे.नवीन कॉलनीतील रस्तेबांधणी, महावीर गार्डनची डागडुजी, पाण्याची समस्या कमी करणे, तसेच वीज कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या खुल्या जागेत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्याचा येत्या दहा महिन्यांत प्रयत्न राहणार आहे. रस्ते, वीज व पाण्याची नव्या व जुन्या कॉलनीत अग्रक्रमाने सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. - मृदुला पुरेकर, नगरसेविकाप्रतिबिंब प्रभागाचे--प्र.क्र. १९(शाहूपुरी उत्तर)संतोष पाटील