गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सर्व गटांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना, स्वाभिमानी व काँग्रेस युतीचे श्री शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी यांच्यात दुरंगी सामन्याचे चित्र माघारीनंतर शनिवारी स्पष्ट झाले. उमेदवारी दाखल केलेल्या १७९ पैकी १२६ जणांनी माघार घेतली. १९ जागांपैकी हमाल-तोलारी गटाची एक जागा बिनविरोध झाली. उर्वरित १८ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. २ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी आघाडीत गडहिंग्लजमधील आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाशराव चव्हाण, अॅड़ श्रीपतराव शिंदे व हत्तरकी गट आजऱ्यातील चराटी, शिंपी व आपटे गट, चंदगडमधील नरसिंगराव भरमूअण्णा व गोपाळराव गट आणि कागलमधील आमदार हसन मुश्रीफ, विक्रमसिंहराजे गट व मंडलिक गट एकत्र आले आहेत. विरोधी आघाडीत शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बंटी पाटील गट व शहापूरकर गट एकत्र आले आहेत. सत्ताधारी आघाडीतून विद्यमान ८ संचालक पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यापैकी हमाल -तोलारी गटातून बाबूराव चौगुले हे बिनविरोध निवडून आले आहेत. सत्ताधारी आघाडीतून विद्यमान सभापती अशोक चराटी, उपसभापती चंद्रशेखर पाटील, संचालक उदयकुमार देशपांडे, नामदेव नार्वेकर, चंद्रकला बामुचे, विश्वनाथ करंबळी व नारायण बांदिवडेकर यांच्यासह धनाजी काटे, रवींद्र शेंडुरे, गोविंद सावंत, संभाजी सुतार, किरण कांबळे, जयवंत शिंपी, दयानंद नाईक, जितेंद्र शिंदे, सारिका चौगुले, सुमन लकडे हे रिंगणात आहेत. विरोधी आघाडीतून संदीप पाटील, अशोक पाटील, अशोक महाडिक, एकनाथ नार्वेकर, अंकुश गवस, महादेव वांद्रे, दशरथ पारदे, उत्तम नाईक, भीमराव कुंभार, सुनंदा पाटील, प्रकार खांडेकर, फुलाजी खैरे, सूर्यकांत देसाई, सरिता कांबळे, राचय्या स्वामी व परेश पोतदार हे रिंगणात आहेत.
गडहिंग्लज बाजार समितीसाठी दुरंगी लढत
By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST