शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

विनातारण कर्जही नाही अन् अनामत रकमेचे पैसेही बुडले, कोल्हापुरातील एका निधी बँकेचा अनेकांना गंडा

By विश्वास पाटील | Updated: July 19, 2024 14:18 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या काही टक्के अनामत रक्कम रोख आमच्या बँकेत भरा, असे आमिष दाखवून नव्यानेच स्थापन झालेल्या एका निधी बँकेने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पैसे भरलेल्या एकाही व्यक्तीला कर्ज मिळालेले नाही आणि अनामत म्हणून घेतलेली रक्कमही परत मिळत नसल्याने कर्ज मागणारे हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीचा आकडा काही लाखांत आहे.तारण द्यायला काहीच नसते; परंतु विविध कारणांसाठी कर्जाची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नावावर घर नसते, शेतीचा सातबारा एकत्रित असतो. नोकरी खासगी असते, सोनेनाणे नसते मग तारण काय द्यायचे, असा प्रश्न असतो. त्यांना कर्ज हवे असते, त्याचे नियमित हप्ते परत करण्याचीही त्यांची तयारी असते. ही अगतिकता ओळखूनच या बँकेने विनातारण कर्जाचा जाहिरात केली. करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील एका तरुणाचे लग्न ठरत नव्हते. त्यासाठी घराची डागडुजी त्याला करायची होती. त्यासाठी कर्ज हवे होते म्हणून त्याला कुणीतरी या बँकेचा पत्ता दिला. त्यानुसार तो मित्राला घेऊन बँकेत गेला. बँकेने तीनच नव्हे, तर पाच लाख देतो, असे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी १३,५०० रुपये ३ एप्रिल २०२४ ला बँकेत रोख भरले. सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला महिनाभर लागेल असे सांगितले; परंतु आता तीन महिने उलटून गेले तरी अजून कर्जाचा पत्ता नाही. कर्ज कधी मिळणार म्हणून मित्रासह तो हेलपाटे मारून दमला आहे. आता या बँकेचे कार्यालय रंकाळ्याजवळ आले आहे. तिथे अनेक लोक कर्ज तरी द्या किंवा आमची अनामत तरी परत द्या म्हणून गर्दी करीत आहेत. काहींनी ३५ हजार, काहींनी त्याहून जास्त रक्कम भरली आहे. जेवढी कर्ज जास्त तेवढी अनामत जास्त असा त्यांचा नियम आहे. आता तुमचे खाते अपडेट करण्यासाठी २ हजार रुपयांची एनईएफटी करा, असे त्याला सांगितले आहे; परंतु अनामत व नंतर एनईएफटी करूनही सहा-सहा महिने झाले तरी कुणाला कर्ज मिळालेले नाही.

भेटायचे कुणाला..?बँकेत कोणही जबाबदार अधिकारी भेटत नाही. लिपिक काम करणारे दहा ते बारा तरुण असतात. तेही सतत बदलतात. साहेब दिल्लीला गेले होते. त्यामुळे कर्जमंजुरी लांबली असल्याचे कारण बँकेतील लोक देत आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकfraudधोकेबाजी