शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तेल भेसळ शोधणारे टीपीसी मशीनच नाही, कोल्हापुरातील अन्न व औषध प्रशासनाने पुण्याहून घेतली उसनी मशीन 

By भीमगोंड देसाई | Updated: October 12, 2023 15:28 IST

वारंवार तळले जाणारे खाद्यतेल ओळखायचे कसे?

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या येथील अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तळले जाणाऱ्या तेलामधील भेसळ ओळखणारे एकही टीपीसी मशिन नाही. वारंवार शासनाकडे मागणी करूनही न मिळाल्याने पुण्याहून दोन मशिन उसनवारीवर मागवून घेतली आहेत. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे या मशिनची गरज असताना जिल्ह्याला एकही हक्काचे मशिन उपलब्ध नसल्याने शासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.दोनच उसन्या घेतलेल्या मशिनवर कामकाज करताना अन्न व औषध प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यामुळे वारंवार तळले जाणारे खाद्यतेल ओळखायचे कसे? असा प्रश्न अन्न व औषध प्रशासनालाही पडला आहे. अशाप्रकारे तेल वापरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्याचा सर्रास वापर होत आहे. परिणामी अशा तेलातील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांना पोटविकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दसरा, दिवाळी जवळ आली आहे. या सणांत मोठ्या प्रमाणात तेलकट पदार्थांना मागणी असते. यामुळे असे पदार्थ बनविण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. पण दर्जेदार तेल वापरल्याने नफा कमी होतो. परिणामी विक्रेते पैसे वाचवून नफा मिळविण्यासाठी वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करतात. भेसळीच्याही तक्रारी आहेत. स्वस्त, निकृष्ट, हानिकारक तेलाचाही वापर होत आहे. याची तपासणी करून कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रे पुरेशा प्रमाणात नसल्याचे चित्र आहे.

काय आहे टीपीसी मशिन ?टीपीसी म्हणजेच टोटल पोलर काऊंट मशिन. या मशीनद्वारे जळालेले तेल तपासता येते. त्या तेलात भेसळ आहे की नाही, याचीही स्पष्टता होते. त्यानंतर या विभागाकडून संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाते. त्यांना दंड ठोठावला जातो.

१२ मशिनची आवश्यकताजिल्ह्यासाठी १२ टीपीसी मशिनची गरज आहे. या मशिनव्दारे तपासणी करण्यासाठी १२ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण यातील सहा पदे रिक्त आहेत. केवळ सहाच अधिकारी कार्यरत आहेत. सहा अधिकारी आणि पुण्याहून उसनी मागून घेतलेली दोन टीपीसी मशिन यावर सध्या कामकाज सुरू आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेकवेळा कारवाई करताना अडचणी येत आहेत.

जिल्ह्यासाठी १२ टीपीसी मशिनची आवश्यकता आहे. पण येथील कार्यालयाकडे एकही मशिन नसल्याने पुण्याहून दोन मशिन उसनी मागून घेतली आहेत. - तुषार शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर