शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकसष्टीत गाजली राजकीय टोलेबाजी

By admin | Updated: June 27, 2016 00:36 IST

परस्परांना काढले चिमटे : कुरघोड्यांमुळे झाले कार्यकर्त्यांचे मनोरंजन

इचलकरंजी : माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम असला तरी आजी-माजी आमदारांच्या राजकीय टोलेबाजीनेच गाजला. आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी आपल्या भाषणातून गत राजकीय इतिहासाचा पाढा वाचत परस्परांचे चिमटे काढले.श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाच्या सांस्कृतिक मंचावर झालेल्या कुरघोड्यांमुळे शनिवारी राजकीय क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांचे चांगले मनोरंजन झाले. कार्यक्रमात जांभळे यांचे राजकीय क्षेत्रातील सहकारी हिंदुराव शेळके यांनी टोलेबाजीला सुरुवात केली. ते म्हणाले, माझी दीर्घकालीन राजकीय कारकीर्द राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेली असली तरी हाळवणकरांमुळे मी भाजपमध्ये गेलो. त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, एकदमच ट्रॅक कसा बदललास. त्यावर मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्याकडे आलो तर पुन्हा कार्यकर्ताच व्हायला पाहिजे; पण विरोधी पार्टीत जाऊन आता नेता झालो.अशोक स्वामी यांनी, राजकारणात आता मध्येच लटकत असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीतून निलंबित झालोय आणि हाळवणकर काही भाजपत घेत नाहीत.प्रकाश आवाडे म्हणाले, नगरपालिकेत आम्हाला (कॉँग्रेसला) निसटे बहुमत मिळाले; पण जांभळे असे किमयागार आहेत की, ते दोन-तीन नगरसेवकांची उलथापालथ केव्हाही करू शकतात. म्हणून आम्ही त्यांनाच (राष्ट्रवादीला) सत्तेत घेतले.आवाडे यांच्या भाषणातील धागा पकडत सुरेश हाळवणकर म्हणाले, शहराच्या विकासाची मोट बांधावयाची संधी मिळाली तर जांभळे आमच्याबरोबर असतील आणि भाजपमध्ये आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे निश्चितच चीज होते.आमदार मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील गटा-तटाच्या राजकारणाचा उल्लेख करताना आवाडेंना चिमटा काढला. ते म्हणाले, नगरपालिकेच्या राजकीय बेरजेत आवाडेंनी जांभळेंना आपलेसे केले आणि मला तोंडघशी पाडले.सुनील तटकरे यांनी जांभळे यांना आवाडे व हाळवणकर दोघेही आपलेसे करण्यासाठी चढाओढ करताहेत, कारण नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत कोपरखळी मारली. मात्र, इचलकरंजीत या व्यासपीठावर राजकारणाचे चांगलेच वस्तुपाठ मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आवाडेंनी हायजॅक केले, हाळवणकरांनी पळविलेलोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवेळचा अनुभव सांगताना निवेदिता माने म्हणाल्या, विधानसभेचा उमेदवार कोण, या स्पर्धेत जांभळेंनी बाजी मारली आणि शेळके आम्हाला (राष्ट्रवादीला) कायमचेच दुरावले. नगरपालिकेच्या राजकारणात आवाडेंनी शेळकेंना हायजॅक केले, तर आता हाळवणकरांनी त्यांना पळवून नेले.नगराध्यक्षांचे बंड ही आमची चूकनगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडाबाबत प्रकाश आवाडे म्हणाले, नगराध्यक्षा आमच्या पक्षाच्या असल्या तरी आमच्या नाहीत. यामागे मात्र आमची चूक आहे; मात्र जांभळे यांच्या किमयेमुळे त्या विरोधकांच्याही नाहीत.