शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

...तर सदाभाऊंना पुन्हा ‘स्वाभिमानी’मध्ये घेऊ सावकर मादनाईक : टीकेला उत्तर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:51 IST

सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत

ठळक मुद्देउसाला साडेतीन हजारांचा दर द्यायला सांगा

उदगाव (जि. कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार ५७५ रुपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडावे. तसे झाल्यास खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊन त्यांचा ऊस परिषदेत जाहीर सत्कार करू, असे प्रतिउत्तर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी मंत्री खोत यांना दिले.

भाजप सरकारने यावर्षी उसाच्या एफआरफीमध्ये मोठी वाढ केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी बारा टक्के उताºयाला तीन हजार ५७५ रुपये इतका दर मिळणार आहे. काही साखर कारखान्यांनीही तशी तयारी दाखविली आहे. त्यामुळे आंदोलनाचे नाटक करू नका, अशी टीका कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली होती. त्या पार्श्वभूमीवर मादनाईक उदगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी चांगल्या ऊसदरासाठी संघर्ष करावा लागतो. गत हंगामात राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यांच्याकडे जवळपास ४६५ कोटींची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचविले आहेत.खोत यांच्याकडून पोरखेळचशेतकºयांना आश्वासनांची गाजरे दाखवीत शेतकºयांना फसवल्याची कामे आता जनतेसमोर आली आहेत. सदाभाऊ खोत यांच्यासारखा नेता जर शेतकºयांच्या पुढे एक आणि पोटात एक अशी भावना ठेवून पोरखेळच सुरू केला आहे. त्यामुळे आता तुम्ही बोलल्याप्रमाणेच तीन हजार ५७५ रुपये दर देऊन दाखवाच, असेही आव्हानही मादनाईक यांनी दिले आहे.