शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

...मगच के.पी. पाटील यांच्यावर टीका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत साखर कारखान्याची झालेली प्रगती बघा. अन् तत्कालीन अध्यक्षांच्या कारकिर्दीत कोटीच्या घरात तोट्यात गेलेल्या कारखान्याची त्यावेळची अवस्था बघा. मगच माजी आमदार पाटील यांच्यावर टीका करा, असा टोला माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे नाव न घेता ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्ष कारकिर्दीत साखर कारखान्याची झालेली प्रगती बघा. अन् तत्कालीन अध्यक्षांच्या कारकिर्दीत कोटीच्या घरात तोट्यात गेलेल्या कारखान्याची त्यावेळची अवस्था बघा. मगच माजी आमदार पाटील यांच्यावर टीका करा, असा टोला माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे नाव न घेता भुदरगडचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पंडितराव केणे यांनी लगावला.करडवाडी (ता. भुदरगड) राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सभासदांच्या येथील संपर्क मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ज्याच्या घरात मीठ, भाकर खाल्ली त्याची जरा तरी जाण ठेवून व्यक्तिगत पातळीवर बोलावे, असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता लगावला.यावेळी माजी आमदार नामदेवराव भोइटे, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, के.डी.सी. बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, सुनील कांबळे, शेखर देसाई, मधुकर भोई, तानाजीराव कुरडे, श्रीपतराव दाभोळे, दौलतराव जाधव, नंदू पाटील, डी. जी. एकल, नेताजी पाटील, श्रीपती पाटील, जीवन पाटील, बाळासाहेब भोपळे, संग्राम देसाई, विलासराव झोरे, विलासराव कांबळे, धनाजीराव देसाई, विश्वनाय कुंभार, सर्जेराव देसाई, विजयराव आबिटकर, दत्ता पाटील, अजित सूर्यवंशी, शेखर देसाई डी. एम. चौगले, आदी उपस्थित होते. आभार प्रकाश बेलकर यांनी मानले.