चंदगड / प्रतिनिधी हिंडगाव (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिर येथून चोरट्याने इंटेक्स कंपनीचा ३२०१ मॉडेलचा स्मार्ट टीव्ही संच चोरून नेला आहे. २६ डिसेंबर २०२० ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान ही चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार हिंडगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोकीतकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. हा टीव्ही संच हिंडगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेला भेट दिला होता. हा टीव्ही सहावीच्या वर्गखोलीत लावण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्याने याचा फायदा घेत अज्ञाताने शाळेतील टीव्ही संचाची चोरी केली. या टीव्ही संचाची किंमत ४ हजार रुपये आहे. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून, पोलीस हेडकाॅन्स्टेबल नांगरे अधिक तपास करत आहेत.
हिंडगाव प्राथमिक शाळेतून टीव्ही संचाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST