शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कुरिअर कार्यालयात चोरी

By admin | Updated: October 19, 2016 00:39 IST

तीन लाखांचा ऐवज लंपास : बनावट चावीने कुलूप काढून डल्ला

सांगली : येथील सराफ कट्ट्यावरील तिरुपती कुरिअर सर्व्हिसच्या बंद कार्यालयाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी साठ हजारांचे सोन्याचे दागिने, दोन लाख साठ हजारांची रोकड असा तीन लाख २० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पावणेपाच यादरम्यान चोरीची ही घटना घडली आहे. शहर पोलिसांनी चौकशी करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तानवडे बुक सेलर्ससमोरील ‘सानिका भवन’मधील न्यू सराफ अपार्टमेंटमधील तळघरात तिरुपती कुरिअर सर्व्हिसचा गाळा आहे. नऊ कर्मचारी येथे नोकरीला आहेत. अविनाश भानुदास माने (वय २१, रा. फलटण, सध्या कोल्हापूर) याच्यासह सर्व कर्मचारी सोमवारी दुपारी तीन वाजता कार्यालयास कुलूप लावून पार्सल वितरणासाठी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी बनावट चावीने कार्यालयाचे कुलूप काढून आत प्रवेश केला. आत कुरिअरची दोन पार्सल होती. यामध्ये साठ हजारांचे दागिने व दोन लाख ६० हजारांची रोकड होती. ही दोन्ही पार्सल घेऊन चोरट्यांनी शटर्स लावून पलायन केले. पावणेपाच वाजता अविनाश माने आला. त्यावेळी शटर्सचे कुलूप काढलेले दिसले. तो आत गेला असता, पार्सल विस्कटलेली नव्हती; पण दागिने व रोकड असलेली दोन पार्सल गायब असल्याचे दिसले. त्यानंतर सर्व कर्मचारी आल्यानंतर चौकशी केली; पण चोरीबद्दल कोणालाच माहिती नव्हती.अविनाश मानेसह सर्व कर्मचारी रात्री नऊ वाजता शहर पोलिस ठाण्यात गेले व पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांना त्यांनी या घटनेची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी ३२ लाखांचा ऐवज गेल्याची माहिती दिली, पण इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेल्या ऐवजाबद्दल या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली.कर्मचाऱ्यांची चौकशीबनावट चावीने कुलूप काढून चोरी झाल्याने पोलिसांनी कुरिअरमधील नऊ कर्मचाऱ्यांना रात्रीच ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे बसवून चौकशी केली जात आहे. सर्व कर्मचारी, पार्सल वितरणासाठी गेलो होतो, अशी माहिती देत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागही तपास करीत आहे. अजून कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत.