शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पानसरे खुनात वापरलेली दुचाकी बेळगावमधून जप्त, पंच साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

By उद्धव गोडसे | Updated: April 15, 2024 19:34 IST

संशयितांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढील तारखेस

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील आरोपींनी वापरलेली दुचाकी बेळगावमधील एका गॅरेजमधून दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केली होती, अशी साक्ष पंच साक्षीदाराने जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी (दि. १५) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, संशयितांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही.

विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर संशयित हल्लेखोर बेळगावच्या दिशेने पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने शोध घेऊन बेळगावमधील एका गॅरेजमधून संशयित दुचाकी जप्त केली होती. त्यावेळच्या पंच साक्षीदारांची साक्ष सोमवारी झालेल्या सुनावणीत नोंदवण्यात आली.साक्षीदाराने त्यावेळचा घटनाक्रम सांगून अटकेतील संशयित भरत कुरणे याच्या भावानेच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. उलट तपासात बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारावर प्रश्नांची सरबत्ती करत दुचाकीचा खोटा पुरावा सादर केल्याचे मत मांडले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे साक्षीदाराने नाकारले. सुनावणीसाठी काही संशयित प्रत्यक्ष, तर काही संशयित व्हीसीद्वारे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय