शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:53 IST

बंद घराचे मागील बाजूचे कौले काढून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

गारगोटी: पिंपळगाव ता.भुदरगड येथील महादेव शिवराम चव्हाण यांच्या बंद घराचे मागील बाजूचे कौले काढून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,चव्हाण कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूने घराच्या छतावरील कौले काढून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले.दुपारी कुटुंबीय दुपारी घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.त्यांनी तत्काळ भुदरगड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.घराच्या पाठीमागे मोकळी जागा व शेती असल्याने चोरट्यांनी त्या मार्गाने पलायन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ञ व फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपासणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक योगेश गोरे करीत आहेत.

ग्रामीण भागातही घरफोड्यांची धास्ती

शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागातही दिवसा घरफोडीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामानिमित्त घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर बंद घरांना चोरटे लक्ष्य करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.खेडेगावातील घरांनाही आता चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : House roof tiles removed, theft: Gold, cash stolen!

Web Summary : Thieves stole gold jewelry and cash from a house in Pimplagaon after removing roof tiles. Police investigation is underway; dog squad was called. Rural residents express fear due to rising daytime burglaries.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी