शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषात खोल खंडोबाची पालखी उत्साहात

By संदीप आडनाईक | Updated: December 18, 2023 23:15 IST

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: मार्गशीर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील प्राचीन खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत  'येळकोट येळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा येळकोट' असा जयघोष केला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

खोल खंडोबा मंदिरासह शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिर, रामानंद नगरातील खंडोबा मंदिर आणि अंबाबाई मंदिरातील खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सव पार पडला. हे अतिशय प्राचीन मंदिर जमिनीत २० ते ३० फूट खोल आहे. मंदिरात खाली जाण्यासाठी ओबडधोबड दगडी पायऱ्या आहेत. मंदिराच्या भोवती मुस्लिम स्थापत्य शैलीनुसार घुमट आहे. घुमटावर कळस आणि कमळाच्या पाकळ्या आहेत. 

चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई केली आहे, तसेच के. के. बॉइज ग्रुप, मृत्युंजय मित्र मंडळ , हनुमान सेवा मंडळ आणि साई मित्र मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. खोल खंडोबा देवस्थान ट्रस्टतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. उत्सवाची सांगता सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने झाली. रात्री पावणे आठच्या सुमारास मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती व पालखीला सुरुवात झाली.मंदिराभोवती पाच फेऱ्या काढण्यात आल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर