शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

नामदेवराव व्हटकर यांचा 'महापरिनिर्वाण' लवकरच झळकणार, डॉ. आंबेडकरांचा अखेरचा प्रवास पाहायला मिळणार

By संदीप आडनाईक | Updated: December 6, 2024 13:24 IST

घरदार विकून केले चित्रिकरण, कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शक

संदीप आडनाईक कोल्हापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे कवी, लेखक, नाटककार आणि आमदार नामदेवराव लक्ष्मण व्हटकर यांनी चित्रित केला होता. त्यांनी या चित्रिकरणासाठी स्वत: चे घरदार, प्रेस विकून साडेतीन हजार फुटाचे चित्रिकरण करून ठेवले होते. पुढे ते सरकारकडे जमा केले. हा एकमेव ठेवा व्हटकर यांनी जतन करून ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण : एक कथा, दोन इतिहास' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.महामानवाने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरिता आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता प्रचंड जनसागर उसळला होता. त्यांचा हा अखेरचा प्रवास कोल्हापूरचे दिग्दर्शक नामदेवराव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता. या दरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहीत नाहीत, त्या या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. हा मन सुन्न करणारा प्रसंग व्हटकर यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे, अशी माहिती त्यांच्या नात प्रा. नीलिमा शरद व्हटकर यांनी दिली.हा चित्रपट डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित व्हावा, यासाठी प्रयत्न होता, परंतु त्याला अजून तीन महिने वेळ लागणार आहे. व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारली आहे. शिवाय अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही झळकत आहेत. मात्र डॉ. आंबेडकर यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे असून, अमर कांबळे डीओपी आहेत. या चित्रपटाची पटकथा चेतक घेगडमल यांनी लिहिली आहे.कोल्हापुरातील नामवंत दिग्दर्शकनामदेव व्हटकर हे मराठीतील ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक होते. सुलोचना अभिनित 'आहेर' हा १९५७ मधील चित्रपट, हंसा वाडकर अभिनित 'मुलगा' हा १९५६ मधील चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. राम गबाले यांच्या 'घरधनी' या पु. ल. देशपांडे यांच्यासोबतच्या १९५२ मधल्या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर