शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

पावणेतीन कोटींचे सर्जिकल साहित्य खरेदी प्रकरण: 'सीपीआर'च्या पाच डॉक्टरांसह आठ जणांवर ठपका

By समीर देशपांडे | Updated: July 25, 2025 12:56 IST

तीन वर्षात केवळ १४ टक्के साहित्याचा वापर

समीर देशपांडेकोल्हापूर : मुलुंड आणि वरळी येथील बोगस दरकरारपत्राआधारे २ कोटी ८९ लाख रुपयांच्या सर्जिकल साहित्य खरेदी प्रकरणी सीपीआरमधील पाच डॉक्टरांसह आठ जणांवर चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. हा चौकशी अहवालच ‘लोकमत’च्या हाती लागला असून यामध्ये सीपीआरमध्ये भ्रष्टाचाराची गटारगंगा कशी वाहते याचे दर्शन घडते. ‘लोकमत’ने २५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्याच दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशी समितीची स्थापना केली होती. दुसऱ्याच दिवशी सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखाली मनोज दाभाडे आणि कमलेश निरंजन यांची चौकशी समिती कोल्हापूरमध्ये आली. तीन दिवस समितीने चौकशी करून आपला अहवाल १ जुलै रोजी विभागाच्या संचालकांना सादर केला होता.ठेकेदार मयूर लिंबेकर यांनी दरकरारपत्राची खोटी प्रत सादर करून २ कोटी ८९ लाख, २५ हजार २१० रुपयांची सर्जिकल साहित्य खरेदी करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, सन २०२०/२१ ते २०२४/२५ या कालावधीत ४ कोटी ८६ लाख व २ कोटी ८९ लाख इतक्या रकमेच्या खरेदीमध्ये शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळेच जिल्हा नियोजन समितीकडून सीपीआर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आलेल्या खरेदीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, अशीही शिफारस चौकशी समितीने केली आहे.

तीन वर्षात केवळ १४ टक्के साहित्याचा वापरकेवळ पैसे मिळवण्यासाठी गरज नसताना यावेळी जादा खरेदी केल्याचे समितीने उघड केले आहे. खरेदी केलेल्या ८७१०० सर्जिकल नगांपैकी तीन वर्षात रूग्णांसाठी केवळ १२ हजार ६५० नगर वापरण्यात आले असून ७४ हजार ४५० नग पडून आहेत. म्हणजे तीन वर्षात केवळ १४ टक्के साहित्य वापरण्यात आले असून उर्वरित पडून आहे. त्याची मुदत संपणार असल्याने ते इतर रूग्णालयांना पाठवण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

यांच्यावर ठेवला ठपकासर्जिकल स्टोअर लिपिक रमेश खेडेकर, सर्जिकल स्टोअर इन्चार्ज डाॅ. सारंग ढवळे, तत्कालिन प्रशासकीय अधिकारी अश्विनीकुमार चव्हाण, खरेदी समितीचे सदस्य सचिव डॉ. वसंत देशमुख, समिती सदस्य डॉ. एस. डी. शानभाग, डॉ. राहुल बडे, डॉ. गिरीश कांबळे, नेहा कापरे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता हलगर्जीपणा केलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९१७९ नुसार कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक आहे असे या अहवालातील शिफारशींमध्ये नमूद करण्यात आले आहे.