शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ashadhi wari 2025: माणिक-राजा ओढणार तुकाराम महाराजांचा रथ, आप्पाचीवाडीच्या बैलजोडीला मिळाला कायमस्वरुपी मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:54 IST

बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले.

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा देहू येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा बहुमान आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील बाबुराव अर्जुन खोत यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला कायमस्वरूपी लाभला आहे. ही बैलजोडी देहू संस्थांनकडून खरेदी केली आहे. बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले.अगदी पाहतच राहावा असा पांढरा शुभ्र, अंगाने धिप्पाड, एकसारखा जोडा असणारी ही बैलजोडी गावची शान होती. त्यामुळे बैलजोडीला निरोप देताना खोत कुटुंबासह गावकरी भावनाविवश झाले होते. परंतु, तुकाराम महाराज यांच्या ७५० व्या पुण्यतिथी वर्षात आपली बैलजोडी भगवंताच्या सेवेत लीन होण्यासाठी जात असल्याने त्यांना मनोमनी आनंदही वाटत होता.

यापूर्वी या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी ही तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. मात्र रथ ओढण्यासाठी आपल्याच बैलजोडीला मान मिळावा यासाठी चढाओढ लागत असत. त्यामुळे रथासाठी हक्काची बैलजोडी असावी या उद्देशाने देहू संस्थानने महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात बैलजोडीची चाचपणी करताना त्यांना खोत यांची बैलजोडी पसंत आली.दरम्यान, २०२१ व २०२३ मध्ये खोत यांच्याकडील पुण्यातील बड्या मंडळींनी खरेदी करून ती या रथासाठी दिली होती. ५० एकर जमीन असणाऱ्या खोत कुटुंबातील पाच भावंडे एकत्रितपणे राहतात.

मिरवणुकीने निरोपपहिल्यांदाच संस्थानने बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा बहुमान श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील बैलजोडीला लाभला. त्यामुळे बैलजोडीला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते.

आमच्या कुटुंबातील सदस्यच असणाऱ्या बैलजोडीला तुकाराम महाराज यांच्या सेवेचा मान मिळाला हे आमचे परम भाग्यच आहे. आमच्या कुटुंबीयांनी अगदी आनंदाने ही बैलजोडी देहू संस्थानकडे सोपविण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याने आर्थिक व्यवहारही पूर्ण केला. - बाबुराव खोत, शेतकरी आप्पाचीवाडी