शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित

By सचिन भोसले | Updated: March 17, 2023 16:44 IST

अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तोफांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या

कोल्हापूर : पन्हाळगडावरील नगरपालिकेच्या दारातील पाच तोफा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या आहेत. त्या उद्या, रविवारी सकाळी शहरातून शोभायात्रा काढून पन्हाळ्यावर विराजमान होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.साळुंखे म्हणाले, शिवराष्ट्र परिवार, महाराष्ट्रच्या वतीने गेली ३० वर्षांपासून पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेसह दर रविवारी गड संवर्धन केले जाते. त्याला अभिनेते सयाजी शिंदे यांचे बळ लाभत आहे. पन्हाळा नगरपालिकेच्या दारातील ५ तोफांना तोफगाडे तयार करण्याचे काम केले आहे. या तोफा ऊन, वारा, पावसाला तोंड देत आहेत. त्यांचे संर्वधन होणे काळाची गरज आहे. या जाणिवेतून बाभळीच्या जुन्या लाकडामध्ये राजाराम व बाळकृष्ण सुतार या पिता-पुत्रांनी तोफगाडे कलाकुसरीने बनविले आहेत. या तोफगाड्यांची रविवारी सकाळी प्रथम मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी आणि गंगावेश येथपर्यंत शोभायात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर त्या पन्हाळगडावर विराजमान होणार आहेत. या प्रसंगी शहाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, न्यायाधीश बी.डी. कदम, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उत्तम जाधव, पन्हाळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, विजय पाटील, आसीफ मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड