शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

छ. शिवराय ज्या मार्गानं पन्हाळ्यातून निसटले; त्या राज दिंडी येथील तटबंदी कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 19:36 IST

महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत येत आहे. तर तटबंदी व वरील भाग हा  पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो.

पन्हाळा - शनिवारी मध्य रात्री नंतर राज दिंडी येथील गडाला संरक्षण देण्यासाठी असलेली तटबंदी कोसळली, यामध्ये तटबंदीचे काही मोठे लहान दगड, शाडूचे मोठे काही भाग या मुख्य मार्गावर कोसळले असल्यामुळे हा मार्ग आता धोकादायक बनला असून आणखीन तटबंदीचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.            

पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून विशाळगडाकडे जाण्यासाठी बाहेर पडलेला मार्ग म्हणजे राज दिंडी, राजांची पालखी या मार्गे गेली होती म्हणून या मार्गाला राज दिंडी असे म्हटले जाते. महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत येत आहे. तर तटबंदी व वरील भाग हा  पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. सध्या वनविभागाने गडावरील नागरिकांच्या शेतजमीनी खालील वाड्या वस्तीमध्ये असल्याने नागरीकांना व वाडी वस्तीतील लोकांना  गडावर ये जा करण्यासाठी पायी मार्ग  पूर्णपणे बंद केला आहे. कोसळलेल्या तटबंदीची वनविभाग व पुरातत्व विभाग यांनी पाहणी केली आहे. वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, पडलेल्या तटबंदीचा भाग पाहण्यासाठी व  तटबंदीवर जाऊन फोटो काढण्यासाठी, आपला जीव धोक्यात घालून कोणीही या परीसरात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.