शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत

By समीर देशपांडे | Updated: July 23, 2024 17:37 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ...

समीर देशपांडेकोल्हापूर: यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हेच महत्त्व ओळखून माणगाव (ता. हातकणंगले) येथे ५० लाख रुपये खर्चून ‘गोबरधन’ प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाने दिला आहे.बायाेगॅस प्रकल्प उभारण्यात कोल्हापूर जिल्हा गेली २० वर्षे देशात अव्वल आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर विद्युत उपकरणे चालविण्याचा विचार केंद्र शासनाकडून सुरू होता. यातूनच मग गोबरधन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या माणगावची या केंद्र शासनाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीने गावाबाहेरील जागा यासाठी उपलब्ध करून दिली.गॅससाठीची टाकी, स्लरीचा हौद यासह आवश्यक यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली असून, सध्या यामध्ये ओला कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. कचरा जर कमी पडला तर शेजारच्या ज्या गावात आठवडा बाजार असतो तेथील भाज्यांचा कचरा गोळा करून या प्रकल्पावर आणण्यात येणार आहे. या ठिकाणी रोज १५०० किलो कचरा टाकण्यात येणार असून, त्यातून रोज १०० ते १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. यातून माणगावातील १०० हून अधिक असणारे पथदिवे सुरू ठेवण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.

बायोगॅस प्रकल्पापासून आवश्यक तितके खांब टाकण्यात आले असून, येथून निर्माण झालेली ऊर्जा वहन करण्यासाठी तीन ठिकाणी कन्व्हरटर बसविण्यात येणार आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार असून, त्याचा फायदा ग्रामपंचायतीला होऊन वीज बिलात बचत होणार आहे. - माधुरी परीट प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद, कोल्हापूर. 

ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सध्या या ठिकाणी ओला कचरा टाकण्याचे काम सुरू असून, गॅस निर्मिती सुरू आहे. येत्या पंधरवडयात पूर्ण क्षमतेने गॅस निर्मिती होणार असून, याचवेळी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असून, यातून वीज बचतीचा फायदा होणार आहे. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत