शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुढील चाळीस दिवसांत थेट पाइपलाइन योजना पूर्ण होणार

By भारत चव्हाण | Updated: July 9, 2023 18:28 IST

१ ऑगस्टपासून योजनेची चाचणी, साडेदहा लाख लोकसंख्येला पाणी देण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०४५ सालापर्यंत साडेदहा लाख लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची सर्व कामे दि. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. धरण क्षेत्रात योजनेच्या कामाची धांदल उडाली असून जॅकवेलमध्ये पोहोचलेल्या पाण्याचा उपसा जलवाहिनी स्वच्छ करण्याकरिता केला जात आहे. रविवारी धरण क्षेत्रात माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नवीन पाण्याचे पूजन करण्यात आले.रविवारी आमदार सतेज पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह माजी नगरसेवकांच्या सोबत काळम्मावाडी धरण क्षेत्रात जाऊन थेट पाइप लाइन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तेथे सुरू असणाऱ्या सर्व कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या थेट पाइपलाइन योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहून आमदार पाटील यांचे मन भारावून गेले. त्यांनी पाण्याकडे पाहून हात जोडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच माजी नगरसेवकांनी योजनेच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक केले.योजनेसाठी काळम्मावाडीपासून कोल्हापूर शहरातील पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या ५३ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच टाकलेल्या जलवाहिनीची आतून स्वच्छता करण्याचे काम सुरू होऊन २२ किलोमीटरपर्यंत ते पूर्णही झाले आहे. आता ३१ किलोमीटर जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम जुलै महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आतून पाइप स्वच्छ करण्यासाठी नव्याने बांधलेल्या जॅकवेलमधील पाणी उपसा केला जात आहे.बिद्री येथे साडे चार किलोमीटर अंतरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले असून ते पंधरा दिवसांत पूर्ण होत आहे. बिद्री ते काळम्मावाडी २७ किलोमीटर विद्युत वाहिनी टाकण्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

धरण क्षेत्रात दोन जॅकवेल उभारण्यात आली आहेत. दोन्ही जॅकवेलची कामे पूर्ण झाली आहेत. एका जॅकवेलवर उपसा पंप जोडण्यात येत आहेत, तर एक पंप हाऊसच्या स्लॅबचे काम तसेच उपसा पंप जोडण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाला एक महिना लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर