शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Jyotiba Chaitra Yatra:दोन वर्षांनंतर चांगभलंच्या गजरात दुमदुमला जोतिबाचा डोंगर, भाविकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 17:01 IST

पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले.

कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर, हलगी, ढोल ताशांचा निनाद, गुलाल खोबऱ्याची उधळण, आकाशाला गवसणी घालणाऱ्या ससानकाठ्या, मिरवणूक, पालखी सोहळा अभुतपूर्व उत्साहात आज, शनिवारी दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यात्रा होत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची अलोट गर्दी होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले.कोरोनानंतर दोन वर्षांनी यात्रा झाल्याने देवाच्या भेटीची आस घेवून लाखो भाविक गेल्या दोन दिवसांपासून डोंगरावर येत होते. पण गर्दीचे व्यवस्थापन, जाण्या येण्यासाठी स्वतंत्र रांगा, वाढीव पार्कींग आणि वाहतुकीचे प्रशासनाने नेटके नियोजन करुन यात्रा सुरळीत पार पाडली. सकाळी साडेअकरा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांचे जोतिबा मंदिरात आगमन झाले. बारा वाजता त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी भाविकांनी ही यात्रा संयमाने आणि शांततेत पार पाडावी, असे आवाहनही केले.दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. चार वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यमाई मंदिराला भेट दिल्यानंतर तिथे विवाहसोहळा झाला व देवाची पालखी रात्री पून्हा मंदिरात आली. आज रविवारी पाकाळणी होणार आहे.ठिकठिकाणी पार्कींगची सोययंदा भाविक संख्या वाढणार याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पार्कीगची ठिकाणे वाढवली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी न होता विखुरली गेल्याने वाहतुक यंत्रणा व पोलीस प्रशासनावर ताण आला नाही.अन्नछत्रचा २ लाखांवर भाविकांना लाभभाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २ लाखांवर भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. सहजसेवा ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात दोनशेच्यावर भाविकांनी रक्तदान केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा