शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

Kolhapur: बाळूमामांचा महिमा वाढविणारा मेतकेतील रणखांब, ४३ वर्षे उन्हापावसात उभा असतानाही अद्यापही जसाचा तसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:28 IST

रंजल्या-गांजल्यांना आधार

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या मूळक्षेत्र मेतके (ता. कागल) येथे सद्गुरू बाळूमामा यांनी स्वतः उभा केलेल्या रणखांबापुढे आजही भाविक श्रद्धेने नतमस्तक होत आहेत. हा रणखांब चिरकाल स्मरणात राहावा यासाठी खांबासभोवती पंचधातूचे सुरक्षा आवरण केले आहे. भावभक्तीला उधाण आणणाऱ्या श्रावण महिन्यात खुला करण्यात येणारा हा खांब उद्या, शुक्रवारी दर्शनासाठी खुला होत आहे.१९२२ मध्ये मेंढ्यांच्या मागे फिरत फिरत बाळूमामा हे मेतके येथे आले. त्यांनी येथील कै. दत्तात्रय गणपती पाटील यांच्या घरी वास्तव्य केले. १९३२ मध्ये श्री हालसिध्दनाथांच्या पादुकांची निर्मिती करून नाथांची गादी स्थापन केली. दरम्यान, बाळूमामांनी सुरू केलेला भंडारा उत्सव भाविक आजही तितक्याच श्रद्धेने साजरा करत आहेत. दोन पावले पुढे टाकत ट्रस्टने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भक्तनिवास व मोफत अन्नछत्राची उभारणीही केली आहे.रंजल्या-गांजल्यांना आधारएक खांब कैलासात, तर दुसरा मेतकेत असल्याचे सांगत हा खांब भाविकांच्या इडापीडा कमी करणारा दिव्य रणखांब ठरेल, असा विश्वासही बाळूमामा यांनी व्यक्त केला होता. रंजल्या-गांजल्या माणसांना आधार देण्याचे महान कार्य बाळूमामांच्या हातून झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

तब्बल ४३ वर्षे उन्हापावसातच..नाथांच्या मंदिरासमोर बाळूमामांनी १९३२ मध्ये हा रणखांब उभा केला. तर १९७५ मध्ये लोकवर्गणी आणि सीमाभागातील भाविकांच्या दातृत्वातून मंदिरासमोर भव्यदिव्य मंडपाची उभारणी केली. यामुळे या खांबाला छत निर्माण झाले. मात्र, तत्पूर्वी ४३ वर्षे उन्हापावसात उभा असतानाही अद्यापही तो जसाचा तसा आहे. यामुळे भाविकांची श्रद्धा वाढत गेली.पाटील कुटुंबीयांचे असेही दातृत्व..कै. दत्तात्रय पाटील यांना त्यांच्या घराशेजारची जागा मंदिरासाठी देण्याची मागणी बाळूमामा यांनी केली. यावेळी पाटील यांनी घरातून तांब्याभर पाणी आणून बाळूमामा यांच्या हातावर सोडत जागेचा मालकी हक्क सोडला. कोणताही कागद नसताना मंदिर उभे राहिले. तर त्यांचा मुलगा कै. विश्वनाथ पाटील यांनी २००५ मध्ये ही १३ गुंठे जागा चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे रीतसर कागदोपत्री करून दिली.

असाही निरपेक्ष वारसा..कौलव (ता. राधानगरी) येथील त्यांचे भक्त कै. कृष्णराव पाटील-कौलवकर यांनी त्यावेळी ५ हजार रुपये किमतीची तंबूसाठी कणात (चांदणी) दिली होती. या भव्य तंबूतच भंडारा उत्सव साजरा होऊ लागला. तर त्यांचे नातू पापा पाटील-कौलवकर हे निरपेक्ष कार्याचा वारसा पुढे नेत बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.