शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

आर.टी.ओ विभागाची मेहरबानी, वडापचालकांची दमदाटी

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

मृत्यूचा सापळा : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर अपघात नित्याचे

अमर पाटील-कळंबा _ नऊ प्रवासी व ड्रायव्हर हा नियम प्रादेशिक परिवहन विभागाने गारगोटी वडापधारकांना अपवाद ठेवला असावा. कारण काल (गुरुवारी) ड्रायव्हरसह १६ प्रवासी घेवून जाणारी जीप समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला धडकून एक ठार, १६ प्रवासी जखमी झाले. कळंबा-गारगोटी मार्गावरील हा जिवघेण्या प्रवासाचा थरार नित्याचाच असून चार वर्षांपूर्वी डंपर व वडाप ट्रॅक्स अपघातात दोन मृत्यूमुखी पडले होते त्यापेक्षाही कालचा अपघात भयावह होता. फोर्ड कॉर्नर, संभाजीनगर व कळंबा येथून गारगोटी प्रवासी मिळविण्यासाठी वडापधारकांत स्पर्धा चालते. पण या मार्गावर तीन शाळा, आय.टी.आय., कळंबा ग्रामपंचायत, तीन मंगल कार्यालये, कळंबा जेल, मंडईमुळे प्रचंड वर्दळ. पण तरीही ‘रोख बाय ठोक’ व्यवहाराने वेगाकडे दुर्लक्ष करीत वडाप जोरात सुरु असते. दर गुरुवारी आदमापूरला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी या मार्गावर असते. त्यामुळे गुरुवार हा वडापवाल्यांचा धंद्याचा दिवस. जनावरे कोंबल्याप्रमाणे माणसे कोंबलेल्या, व कांही जण लोंबकळत जात असणाऱ्या वडाप गाड्यांची स्पर्धा या मार्गावर पाहायला मिळते. धंदा तेजीत चालणाऱ्या या गुरुवारने नेमके अपघातास निमंत्रण दिले. कालबाह्य झालेले ब्रेक, कमी असणाऱ्या गुळगुळीत चाकांच्या वेगमर्यादा नसणाऱ्या या गाड्यांवर वाहतूक नियंत्रक विभागाची नजर नसावी, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. त्यामुळे भरधाव वेगाचा हा जीवघेणा खेळ थांबणार कधी, वडापधारकांवर कार्यवाही होणार कधी, या प्रश्नाचे उत्तर प्रादेशिक परिवहन विभागच देऊ शकेल.