शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

रस्ते, टोल रद्दवरून श्रेयवाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:32 IST

पाऊण तास गोंधळ : निष्ठा, शिस्तीची ‘ऐसी की तैसी’

कोल्हापूर : शहरातील वीस कोटींचे रस्ते, टोल रद्दचा निर्णय यावरून बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत श्रेयवाद उसळला. पक्ष, नेते यांच्याबाबत आपली निष्ठा कशी व किती जास्त आहे, हे प्रत्येकाने दाखविण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात सदस्यांमध्ये वादाला तोंड फुटले. दोन्ही आघाड्यांतील महिला सदस्यांनी उभे राहून एकमेकांना सभागृहाची शिस्त शिकविण्याचा प्रयत्न केल्याने सुमारे पाऊण तास गोंधळ निर्माण झाला. पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विषयाला प्रारंभ झाला. ज्यांनी वीस कोटींचे रस्ते मंजूर करून आणले वश्रेयवादासाठी कोपऱ्या-कोपऱ्यांवर फलक उभारले, त्यांनीच खराब रस्त्यांसाठीही जबाबदारी घ्यावी, असा टोला अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. यावर किरण नकाते यांनीही ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत टोलेबाजी सुरू केली. ते म्हणाले, शहरातील रस्ते चकाचक होण्यासाठी टोल आणला म्हणून मोठमोठे होर्डिंग उभा करणाऱ्या दोन मंत्र्यांनी टोल नागरिकांना डोईजड झाल्याने तो पुन्हा पंचगंगेत बुडविण्याचे आश्वासन देऊन नागरिकांची फसगत केली; पण भाजप सरकार आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे टोल रद्द केला, या नकाते यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी आक्षेप घेतला.सर्वपक्षीयांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे चंद्रकांतदादांवर टोल रद्द करण्याची पाळी आली, असे ते म्हणाले. यामुळे भाजप व ताराराणी आघाडीचे सर्व सदस्य उठून उभे राहिले. (पान ३ वर)