शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ठाणेकरांना ‘अंबाबाई मंदिर बंदी’

By admin | Updated: June 24, 2017 01:06 IST

जिल्हाधिकारी : कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव निर्णय; पिता-पुत्रांवर मंदिर समन्वय समितीचे आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी आजवर अंबाबाई मूर्तीशी केलेल्या छेडछाडीबद्दल आक्षेप असून, या पिता-पुत्रांना ‘मंदिर प्रवेश बंदी’ची मागणी केली आहे. कायद्याच्या चौकटीत ही शिक्षा बसते का, याचा अभ्यास करून आणि ठाणेकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करून यावर निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव ठाणेकर पिता-पुत्र अंबाबाई मंदिरात येणार नाहीत, याची खबरदारी पोलीस प्रशासन घेणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी दिली. श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी ९ तारखेला अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली पोशाख घातल्याच्या कारणावरून कोल्हापुरात अंबाबाई मंदिर ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अजित ठाणेकर यांना कोणती शिक्षा देण्यात यावी, याबाबतचा निर्णय शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात यावा, अशी सूचना केली. त्यानुसार शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पोलीस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, डॉ. सुभाष देसाई, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आनंद माने, दिलीप पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारुशीला चव्हाण, महेश जाधव, बाबा पार्टे, आदी उपस्थित होते. यावेळी दिलीप पाटील म्हणाले, सद्य:स्थितीत ठाणेकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्याकडून आणखी चुका होण्याची शक्यता असल्याने त्यांना ‘मंदिर प्रवेश बंदी’ करण्यात यावी. संजय पवार म्हणाले, यापूर्वी बाबूराव ठाणेकर यांच्या पूजेच्या काळातही अनेकवेळा अंबाबाई मूर्तीशी छेडछाड झाली असून या सर्व घटना गंभीर आहेत. इंद्रजित सावंत म्हणाले, बाबूराव ठाणेकर यांनी गुरुवारच्या बैठकीत खोटे वक्तव्य केले असून, त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. त्यामुळे समितीचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना ‘मंदिर बंदी’ करावी. शरद तांबट यांनी गाभाऱ्यात सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी मागणी केली. अ‍ॅड. चारूशीला चव्हाण यांनीही चौकशी पूर्ण होईपर्यंत ठाणेकरांवर मंदिर बंदीची मागणी केली. राजू लाटकर म्हणाले, चंद्रकांतदादांसारखे मंत्री माझ्या पाठीशी आहेत, अशी वक्तव्ये अजित ठाणेकर यांनी केली आहेत. सुरेश साळोखे म्हणाले, ठाणेकर यांनी केलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल आजअखेर माफी मागितलेली नाही. त्यांना अतिशय मग्रुरी आहे. डॉ. सुभाष देसाई यांनी बाबूराव ठाणेकर यांच्या वक्तव्यानुसार मूर्ती संवर्धन प्रक्रियेत श्रीपूजक दोषी नसतील तर या घटनांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून ‘दादां’नी ठाणेकर यांना सुचवलेली शिक्षा ही मनुस्मृतीवर आधारलेली आहे, असे मत व्यक्त केले. वसंतराव मुळीक व आनंद माने यांनीही ठाणेकर यांच्यावर मंदिर प्रवेश बंदीची मागणी केली. विजय देवणे यांनी ठाणेकर यांच्यावर सध्या विविध प्रकारचे गुन्हे नोंद असून त्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेकर पिता-पुत्रांवर अंबाबाई मंदिर प्रवेश बंदीची मागणी केली आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर अशी बंदी घालता येते का, हे पाहावे लागेल. पोलिसांच्यावतीने याबाबत तपास करण्यात येणार आहे. मात्र, हा तपास पूर्ण होईपर्यंत ठाणेकर मंदिर परिसरात येणार नाहीत, याची खबरदारी पोलीस प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रारलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील वादाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक सुरू असताना श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी उपस्थित महिलांकडे पाहून, अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याबाबत गुन्हा दाखल करा, या मागणीची लेखी तक्रार जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. जयश्री राजीव चव्हाण (रा. गारगोटी, जि. कोल्हापूर) यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात अंबाबाई मंदिर समन्वय समितीच्या बैठकीत श्रीपूजक, नगरसेवक अजित ठाणेकर यांना मारहाण करण्यात आली. ठाणेकर यांनी महिलांकडे पाहून सभागृहातच अश्लील हावभाव केल्याचा आरोप जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी केला. त्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले; परंतु पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. पोलिसांचा निषेध करीत महिलांचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना भेटण्यासाठी आले; परंतु ते बाहेरगावी असल्याने त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची भेट घेतली. शर्मा यांनी ‘शाहूपुरी पोलिसांत जा; तिथे तुमची तक्रार दाखल करून घेतली जाईल,’ असे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. येथे ठाणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी लेखी तक्रार दिली. यावेळी त्यांच्यासोबत सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, सुनंदा चव्हाण, सरिता सासने, सुधा सरनाईक, लता जगताप, स्मिता हराळे, सीमा सरनोबत, चारूशीला पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई, उदय लाड, जयदीप शेळके, फिरोज खान, आदी उपस्थित होते. सरकारी पुजारी उंबऱ्याबाहेरचलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे सगळे व्यवस्थापन देवस्थान समितीतर्फे केले जात असताना समितीच्या सरकारी पुजाऱ्यांना मात्र श्रीपूजकांनी देवीच्या उंबऱ्याबाहेरच ठेवले आहे. या पुजाऱ्यांना देवीच्या मूर्तीजवळ जाण्याचा किंवा पूजेचा अधिकार नाही. केवळ समितीकडे पावतीने आलेले अभिषेक करून देणे आणि आलेल्या भक्तांना उंबऱ्यापासून देवीचे दर्शन घडविणे एवढ्यापुरतचे या पुजाऱ्यांचे अधिकार मर्यादित आहेत. सध्या असे चार (निम) सरकारी पुजारी देवीच्या सेवेत आहेत.अंबाबाईच्या गाभाऱ्यातील हक्कदार श्रीपूजक केवळ देवीचे धार्मिक विधी करतात आणि त्यांच्या वारात देवीला नेसविल्या जाणाऱ्या साड्या किंवा अन्य पूजेच्या साहित्याची जोडणी करतात. अलीकडे मूर्ती संवर्धनासाठी म्हणून केवळ एका श्रीपूजकाने पुढाकार घेतला होता. बाकी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसराचा, स्वच्छतेचा, व्यवस्थापनाचा, सुरक्षेचा सगळा खर्च देवस्थान समिती करते. देवीच्या नैवेद्याचा मानही एका कुटुंबाला असून, त्याचीही व्यवस्था समितीतर्फेच केली जाते. शासनाच्या वतीनेही सरकारी पुजारी नेमणे गरजेचे असल्याने साधारण देवस्थान समितीचे अध्यक्ष अ‍ॅड अशोकराव साळोखे यांच्या काळात म्हणजे १९८० च्या दरम्यान देवस्थान समितीने चार सरकारी पुजारी नेमले. हे पुजारी म्हणजे राजर्षि शाहू महाराजांनी स्थापण केलेल्या बिंदू चौकातील श्री शाहू वैदिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांना दरमहा १७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. आता ज्यांच्याकडे देवीच्या पूजेचा अधिकार आहे अशी श्रीपूजकांची ५० कुटुंबे आहेत. त्यातील मुळ श्रीपूजक म्हणून मुनीश्वर यांना मानले जाते व नंतर वहिवाटीने ही संख्या वाढत गेली.सध्या समितीच्या वतीने सरकारी पुजारी म्हणून योगेश व्यवहारे, मारुती भोरे, आदिनाथ सांगळे व सुदाम सांगळे हे काम करीत आहेत. त्यांतील मारुती भोरे व सुदाम सांगळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र देवीचा गाभारा श्रीपूजकांच्या ताब्यात आहे आणि प्रत्येक श्रीपूजकाचे पूजेचे आठवडे ठरलेले असल्याने देवीच्या मूर्तीजवळ जाण्याचा, धार्मिक विधी करण्याचा हक्क या सरकारी पुजाऱ्यांना नाही. हे पुजारी कर्धी मूर्तीजवळ गेलेले नाहीत. पूजा, आरतीसह धार्मिक विधी त्यांनी केलेले नाहीत. देवस्थान समितीकडे आलेल्या भाविकांचे अभिषेक कासव चौकात करून देणे आणि व्हीआयपींसह अन्य भक्तांना उंबऱ्यापासून दर्शन घडविणे एवढ्यापुरतेच त्यांचे काम मर्यादित आहे. श्रीपूजकांकडून कोणी व्हीआयपी आले की त्यांना मात्र गाभाऱ्यात नेऊन दर्शन घडविले जाते. काही कारणाने सरकारी पुजारी गाभाऱ्यात गेले तर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्याने दिली. मूर्ती संवर्धनाबाबत तज्ज्ञांची मते मागविणार लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मूर्तीची पाहणी करून गेलेले पुरातत्त्व खात्याचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी त्यांच्या अहवालात मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचे सुचविले आहे. मात्र, याबाबत अन्य मूर्ती तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा निर्णय शुक्रवारी देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मिश्रा यांना मूर्ती संवर्धनासाठी दिलेल्या सूचनांबाबतची नोटीस श्रीपूजकांना पाठविण्याचे आदेश दिले.देवस्थान समितीची मासिक बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या (अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सचिव विजय पोवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पुन्हा संवर्धनाबाबत तज्ज्ञांची मते मागविण्यात येणार आहे. मिश्रा यांच्या अहवालात मूर्तीसंबंधी कोणती काळजी घेण्यात यावी, याच्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. या सूचनांची नोटीस श्रीपूजकांना पाठविण्यात येणार आहे. त्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यास समितीच्यावतीने कारवाई करण्यात येईल. मिश्रा यांनी मूर्तीची पाहणी करून त्यांचा अहवाल देवस्थान समितीला दिला आहे. ‘देवस्थान’च्या बैठकीत हा अहवाल मांडण्यात आला. मूर्ती बदलाबाबत कोणताही विषय या बैठकीत झाला नाही.