शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेतील मजकूर प्रसारित : तिघांची चौकशी, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:00 IST

कोल्हापूर : मॅकेनिकल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित केल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाने बुधवारी चौकशी केली.

ठळक मुद्देपरीक्षा विभागाची कार्यवाही; सखोल चौकशी करणार : महेश काकडेप्रश्नपत्रिका वितरणासाठी परीक्षा मंडळाने राबविलेली ‘एसआरपीडी’ पद्धती अत्यंत गोपनीय

कोल्हापूर : मॅकेनिकल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित केल्याच्या संशयावरून तीन विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठाने बुधवारी चौकशी केली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून चौकशीची कार्यवाही करण्यात आली.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेतील अभियांत्रिकी विद्याशाखेतील काही विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील मजकूर हा पेपरपूर्वी आणि नंतर व्हॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित होत असल्याची निनावी तक्रारी परीक्षा विभागाकडे आल्या होत्या. यानुसार संबंधित स्वरुपातील चौकशी या विभागाकडून सुरू होती.

याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले, विभागाकडून गोपनीयपणे चौकशी सुरू होती. यात अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल विषयाच्या पाचव्या सत्रातील पेपरमधील प्रश्नांबाबतचा काही मजकूर प्रसारित झाल्याचे बुधवारी आढळले. या अनुषंगाने तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील बोलवून घेतले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. ते प्रकरण विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेवून दोषी सापडल्यास त्यांच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली जाईल. प्रश्नपत्रिका वितरणासाठी परीक्षा मंडळाने राबविलेली ‘एसआरपीडी’ पद्धती अत्यंत गोपनीय आहे. या गोपनीयतेचा जर कोणी भंग केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.बुधवारी मॅकेनिकलच्या पाचव्या सत्रातील प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. त्याबद्दल संशयावरून परीक्षा मंडळाने तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही विषयांच्या पेपरमधील प्रश्नांशी मिळताजुळता मजकूर व्हॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित होत असल्याच्या निनावी तक्रारी विभागाकडे आल्या होत्या.