शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांतील मजुरांची ‘नरेगा’कडे पाठ

By admin | Updated: December 29, 2014 00:11 IST

सधनतेमुळे प्रतिसाद कमी : ५० हजार क्रियाशीलपैकी १३४७ मजूर कामावर

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -जिल्ह्यातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांतील मजुरांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (नरेगा) काम करण्याकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. परिणामी, तीन तालुक्यांत या योजनेतून एकही काम सध्या सुरू नाही. याउलट उर्वरित ९ तालुक्यांत १३४७ मजूर ९१ विविध कामे करत आहेत. जिल्ह्यात एकूण ५० हजार ७०० क्रियाशील मजूर आहेत. मात्र, सधनतेमुळे प्रत्यक्ष कामावरील मजुरांची संख्या कमी आहे. ‘मागेल त्याला काम मिळावे’, यासाठी केंद्र सरकारने ‘नरेगा’ योजना सुरू केली. ही योजना दुष्काळी आणि दरडोई उत्पन्न कमी असलेल्या जिल्ह्यात वरदान ठरली आहे. या योजनेतून काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला १६८ रुपये मजुरी दिली जाते. योजनेतून रोपवाटिका, वृक्षलागवड, सिंंचन विहीर, रस्ते, राजीव गांधी भवन, विहीर पुनर्भरण, शेततळी, समतलचर, नालाबांध, फळबाग लागवड, पाझर तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे, नवीन पाझर तलावाची खुदाई करणे, कालवे दुरुस्ती अशी कामे करण्यास परवानगी आहे. ग्रामपंचायत व अन्य शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली कामे होतात.अलीकडे योजनेच्या अंमलबजावणी पारदर्शकतेवर लक्ष केंद्रित केले आहे. मजुरांच्या बँक खात्यावरच थेट मजुरी जमा होत आहे. त्यामुळे मजुरीच्या रकमेसाठी ‘चिरीमिरी’ देण्यातून सुटका झाली आहे. परिणामी, काही तालुक्यांत योजनेच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कामे राधानगरी, भुदरगड तालुक्यांत सुरू आहेत. शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील मजुरांनी कामाची मागणी केलेली नाही. त्यामुळे एकही काम सुरू नसल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत उसाचे क्षेत्र अधिक आहे. आर्थिक सुबत्ता चांगली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत कायमच ‘नरेगा’कडे मजूर पाठ फिरवत असतात. शाहूवाडी तालुक्यात भात व इतर पीक काढणीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे डोंगरी तालुका असूनही शाहूवाडी तालुक्यातील मजुरांनी ‘नरेगा’च्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वसाधारणपणे सर्वच तालुक्यांत तीन वर्षांत एक दिवस काम केलेल्या क्रियाशील मजुरांच्या एकूण संख्येच्या तुलनेत कामावर असलेल्या मजुरांची संख्या नगण्य आहे.जिल्हा सधन आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत ‘नरेगा’च्या कामांना प्रतिसाद कमी आहे. ज्या तालुक्यात मागणी आहे, तेथे कामे सुरू आहेत. - विद्युत वरखेडकर,उपजिल्हाधिकरी (नरेगा)