शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या कामाचे ‘टेन्शन’: कोल्हापूर सहायक निबंधक रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:44 IST

कोल्हापूर : कर्जमाफीचा सर्वाधिक गोंधळ कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून, त्याचा फटका आता त्यामध्ये काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांना बसू लागला आहे

ठळक मुद्दे रोजच्या नव्या माहितीने अधिकारी अस्वस्थवरिष्ठ पातळीवरून कमालीचा दबाव वाढला

कोल्हापूर : कर्जमाफीचा सर्वाधिक गोंधळ कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असून, त्याचा फटका आता त्यामध्ये काम करणाºया कर्मचारी व अधिकाºयांना बसू लागला आहे. बारा-बारा तास याद्या अपलोड करण्याबरोबरच रोज एक नवीनच माहिती मागविली जात असल्याने कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचले आहेत. याच ताणतणावातून मंगळवारी सकाळी सहायक निबंधक अमित गराडे कार्यालयातच चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करताना अधिकाºयांसह सर्वच यंत्रणेची दमछाक उडाली आहे. प्रोत्साहनपर अनुदानासाठी परतफेडीच्या मुदतीवरून तर याद्यांत घोळ निर्माण झाला. त्यातील त्रुटी काढताना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे. त्रुटी दूर केल्या की पुन्हा फाईल मागे येत असल्याने काय करायचे हेच यंत्रणेला समजत नाही. त्यात सर्वांत मागे कोल्हापूर जिल्हा राहिल्याने वरिष्ठ पातळीवरून कमालीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे बारा-बारा तास कर्जमाफीचे काम जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुरू आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक अमित गराडे यांच्याकडे कर्जमाफीचे काम होते. सोमवारी दिवसभर त्यांनी कार्यालयात बसून संस्था पदाधिकाºयांची माहिती एकत्रीकरण केले. रात्री साडेदहापर्यंत ते कार्यालयातच होते. सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले, फोनवर बोलत आपल्या खुर्चीकडे जाताना चक्कर आली आणि ते खुर्चीवर कोसळले. त्यांची दातखिळी बसल्याने इतर कर्मचारीही घाबरले, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व इतर अधिकाºयांनी गराडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, अरुण काकडे यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली.दीड लाख शेतकºयांची माहिती अपलोडराज्य सरकारच्या कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याच्या कामाने थोडी गती घेतली असून, मंगळवारअखेर ६७५ विकास संस्थांतर्गत दीड लाख शेतकºयांची माहिती अपलोड करण्यात सहकार विभागाला यश आले आहे. संपूर्ण माहिती भरण्यासाठी अजून तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ गेले पंधरा दिवस जिल्हा बँकेत सुरू आहे. याद्यांतील त्रुटी दूर करताना कर्मचाºयांची दमछाक झाली असून, वेळेत माहिती येत नसल्याने सहकार विभागाचा दबाव आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी पुणे, सांगली व सातारा जिल्हा बँकेतील आयटी विभागाचे १५ अधिकारी येथे आणले आहेत; पण जिल्हा बँकेत पुरेसे संगणक प्रणाली नसल्याने कामास विलंब होत असल्याची तक्रार सहकार विभागाच्या अधिकाºयांनी केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी जिल्हा बँकेने ५३ संगणकांची व्यवस्था केल्याने कामाने थोडी गती घेतली आहे. सोमवारअखेर ९२ हजार शेतकºयांची माहिती भरण्यात आली होती. मंगळवारी या कामाने गती घेतली असून ६७५ विकास संस्थातंर्गत सुमारे दीड लाख शेतकºयांची माहिती भरण्यात आलेली आहे. येत्या तीन दिवसांत संपूर्ण माहिती भरण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे.खंडागळे, अहिरेनंतर गराडेकर्जमाफीच्या कामाने अधिकारीवर्ग कमालीचा तणावाखाली काम करत आहे; पण सरकार फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही.कामाच्या तणावामुळे नाशिकचे सहायक निबंधक अहिरे यांचे निधन झाले, तर मंचर (पुणे)चे सहायक निबंधक खंडागळे यांच्यावर अजून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.तोपर्यंत अमित गराडे हे चक्कर येऊन पडल्याने खळबळ उडाली आहे.चावडी वाचनात १०२ अपात्रगेले दीड महिना जिल्ह्यात कर्जमाफीच्या याद्यांचे गावपातळीवर वाचन सुरू होते. यामध्ये नावांवर हरकती घेतल्याने १०२ शेतकरी अपात्र ठरले.