शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरवडेच्या दिगंत पाटील याला दहा लाखांचे बक्षीस, इंग्रजी चित्रपटासाठी लिहिली कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:56 IST

सरवडे (ता. राधानगरी) येथील दिगंत संभाजी पाटील याने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या गिल्ट या संहितेला सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.

ठळक मुद्देसरवडेच्या दिगंत पाटील याला दहा लाखांचे बक्षीस इंग्रजी चित्रपटासाठी लिहिली कथा

दत्ता लोकरेसरवडे : सरवडे (ता. राधानगरी) येथील दिगंत संभाजी पाटील याने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या गिल्ट या संहितेला सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.

दिगंतने गिल्ट या नावांने पटकथा लिहिली असून त्याचा भविष्यात इंग्रजी चित्रपट येऊ शकतो. सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून दिगंतचे वडील संभाजीराव पाटील हे प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले आहेत. आई प्रज्ञा पाटील या आता प्रोफेसर आहेत. दिगंत सध्या व्यावसायिक पटकथा लेखक म्हणूनच काम करत आहे.या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातून साडेतीन हजार स्क्रिप्ट आल्या होत्या. त्यातून ह्यगिल्टह्णला दुसरा क्रमांक मिळाला. अमेरिकास्थित शेजल या मुलीस पहिले २५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. स्पर्धेचा निकाल दोन दिवसांपूर्वी सीएनएन या वाहिनीवरून घोषित करण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अमिर खान, जुही चतुर्वेदी, राजकुमार हिराणी, अंजुम राजाबली अशा मान्यवर कलाकारांनी केले. सिनेस्तान इंडिया संस्थेतर्फे ही स्पर्धा गेल्यावर्षीपासून घेतली जात आहे. त्या कंपनीनेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या पटकथांवर चित्रपट यावेत यासाठी निर्मात्यांबरोबर बक्षीस विजेत्यांचा संपर्क करून दिला आहे.दिगंत हा सध्या टी.व्ही ९ वर गाजत असलेली ह्यप्रेमाचा गेम सेम टू सेमह्ण या मालिकेचे संवाद लेखन करत आहे. एक इंग्रजी कादंबरी लिहिली आहे. ती प्रकाशनच्या वाटेवर आहे. ऑल इंडियन कुस्ती चॅम्पियनशिप विजेते व सुप्रसिद्ध गायक संगीतकार प्रा. संभाजी पाटील वडिलांकडून घरातच तबलावादनाचे धडे घेतले.

सुरांच्या वातावरणासोबत घरातील समृद्ध ग्रंथालयामुळे लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली त्याचा फायदा आता होतो आहे, असे दिगंतने सांगितले. प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटीने भौतिकशास्त्रमध्ये एम.एस्सी करून आयआयटी मुंबई येथे २ वर्ष संशोधन केले. सध्या तबल्यासोबत लेखन करण्यावर लक्ष केंद्रित करून पटकथा लेखन सुरू आहे.

गिल्ट म्हणजे अपराधीपणा..माझ्या पटकथेचा मध्यवर्ती विषयही तोच आहे. एक आत्महत्या होते व ती आत्महत्या का झाली म्हणून सगळे कसे अपराधीपणाचे भाव घेऊन जगतात असा विषय गुंफला आहे.- दिगंत पाटील 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर