शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

फेरीवाल्यांचे तात्पुरते पुनर्वसन

By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST

इचलकरंजीत पालिकेची कारवाई : पर्यायी जागा देण्याची संघटनेची मागणी

इचलकरंजी : मुख्य रस्त्यावरील कपडे विक्री करणारे फेरीवाले यांचे रजिस्टर आॅफिससमोरून तात्पुरते पुनर्वसन प्रांत कार्यालय ते शिवाजी पुतळा चौक या फिल्टर हाऊसलगतच्या रस्त्याकडेला करण्यात आले. आज, गुरुवारी वाहतूक शाखेचे पोलीस सोबत घेऊन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी ही कारवाई केली. यावेळी या मार्गावर गाड्या लावणाऱ्या मोटार मालकांनी विरोध केला. मात्र, विरोध धुडकावून लावत पोतदार यांनी फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले.जयहिंद मंडळाच्या जागेत हे फेरीवाले भाडेपट्टीवर आपले एक खाटचे स्टॉल लावून व्यवसाय करीत होते. त्यानंतर जयहिंद मंडळाने क्रीडांगण वाढविल्यामुळे हे फेरीवाले व्यवसायाकरिता फुटपाथवर आले. त्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पालिकेने कारवाई करत त्यांची दुकाने बंद केली. पर्यायी तात्पुरती व्यवस्था म्हणून रजिस्टर आॅफिसच्या समोरील बाजूस काही दुकानांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, सर्व फेरीवाले त्याठिकाणी बसू शकत नसल्यामुळे एका फेरीवाल्याला दोन दिवसांतून एकदा दुकान लावण्यासाठी नंबर मिळू लागला. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला. याबाबत फेरीवाले संघटनेने अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करून फेरीवाले कायद्यानुसार आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन आमच्याकडून रितसर नगरपालिकेचे भाडे आकारावे, अशी मागणी केली. आज अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन प्रांत कार्यालय ते शिवाजी पुतळा चौक परिसरात मोटार गाड्या पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांना तेथून मोटारी काढायला लावल्या. यावेळी मोटार चालक-मालक संघटनेनेही विरोध केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोतदार यांनी नगरपालिकेच्यावतीने फेरीवाले धोरणानुसार जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्याप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली असल्याने तुम्हालाही या परिसरात पे अ‍ॅण्ड पार्क पद्धतीने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. पालिकेच्या या धोरणाला काही वाहनधारकांनी विरोध केला. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू ठेवून फेरीवाल्यांचे या मार्गावर पुनर्वसन केले. या फेरीवाल्यांकडून हे तात्पुरते पुनर्वसन असल्याचे व आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्गत आणि नियमित भाडे देणे याबाबत पालिका व फेरीवाले यांच्यात करारही करण्यात आला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाडे करारकापड विक्री फेरीवाल्यांकडून हे पुनर्वसन तात्पुरते असल्याचे व आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्गत आणि नियमित भाडे देणे याबाबत यावेळी नगरपालिका व फेरीवाले संघटना यांच्यात करार झाला. दरम्यान, आम्हाला फेरीवाले कायद्यानुसार पर्यायी जागा द्या आणि रितसर भाडे आकारा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.