शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मंदिर फलकावरून अंबाबाई नाव हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:20 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.

ठळक मुद्दे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला भक्तांनी विचारला जाबदेवीच्या नावाबाबत आकस आहे कादेवस्थान समितीने याबाबत तातडीने खुलासा करावा करवीरनिवासिनीतून उलट संभ्रमच...

कोल्हापूर,10 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिराच्या परिसरात तसेच चारही दरवाज्यांवर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर अंबाबाई मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिर असा उल्लेख आहे. मात्र देवस्थान समितीने लावलेल्या फलकांवर करवीरनिवासिनी देवस्थान असा उल्लेख करण्यात आला आहे.

अंबाबाई नावाला कधीच कोणाचीही हरकत नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी देवीचा अंबाबाई असा उल्लेख केला. असे असताना देवीने नाव हटवण्यामागे शासनाच्या म्हणजेच देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबद्दल आकस का आहे असा प्रश्न पडतो.

उत्सव काळात मंदिराच्या नावलौकिकाला बाधा येवून नये व मंदिराची शांतता भंग होवू नये म्हणून या प्रकाराबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. देवस्थान समितीने याबाबत तातडीने खुलासा करावा आणि नाव पूर्वी होते तसेच अंबाबाई मंदिर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बाबा पार्टे, सुशांत चव्हाण, अशोक पोवार, स.ना. जोशी, सुरेश साबळे, धनंजय चव्हाण, रघुनाथ गवळी, गौरव भागवत, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

करवीरनिवासिनीतून उलट संभ्रमच...आदिशक्ती स्वरुप असलेल्या देवीचा काही ठिकाणी महालक्ष्मी तर काही ठिकाणी अंबाबाई असा उल्लेख आहे. कोल्हापुरकरांनी देवीला अंबाबाई रुपात पूजले. आजही कोल्हापुरचे लोक अंबाबाई मंदिर म्हणूनच संबोधतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कागदपत्रांवर करवीरनिवासनी असा उल्लेख असल्याने समितीकडून बदल करण्यात आला आहे.

करवीरनिवासिनी म्हणजे करवीरात निवास करणारी मात्र या शब्दातून हे मंदिर नेमके कोणत्या देवतेचे आहे हे समजत नाही. परस्थ भाविकांना किंवा जगभरातून येणाºया पर्यटकांना देवीचे मुळ स्वरुप कळण्याऐवजी ही नेमकी कोणती देवी असा संभ्रमच होणार आहे. त्यामुळे या शब्दाला विरोध होत आहे.