शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, आम्ही जगायचं तरी कसं !

By admin | Updated: October 5, 2016 00:39 IST

उपचारासाठी डोलीतून प्रवास : पाठारचा धनगरवाडा मूलभूत सुविधांपासून वंचित

राजाराम कांबळे--मलकापूर -शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाईपैकी पाठारचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कोणत्याच मूलभूत सुविधा पाहोचलेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच रस्ते, वाहतुकीच्या सुविधा पोहोचल्या नसल्याने रुग्णाला उपचारासाठी डोलीतून न्यावे लागत आहे. सांगा आम्ही जगायचे कसं? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत.शाहूवाडी तालुका १४१ गावे व २५० वाड्यावस्त्यांतून विभागला आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई पैकी पाठारचा धनगरवाडा डोंगरकपारीत वसला आहे. या वाड्यावर सुमारे पंचवीस कुटुंबे राहत आहेत. आजपर्यंत त्यांना शासनाच्या मूलभूत सुविधांचा लाभ झालेला नाही. वाड्यावर जायला रस्ता नाही, जंगलातून नागरिकांना व शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो. मुलांना शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई येथे जावे लागते. गेले चार महिने वाड्यावर लाईट नाही. पाणी योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था आहे. ओढ्याच्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. लाईट नसल्यामुळे शालेय मुलांना रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागतो.पाचवीपर्यंत शाळा असूनदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली आहे. नागरिकांना उपचारासाठी डोलीतून दहा किलोमीटर मांजरे दवाखान्यात न्यावे लागते. उपचाराअभावी येथील चार ते पाच माणसे दगावली आहेत. पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. तरुणांना मुंबई, पुणे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी जावे लागते.नागरिक जंगलातील औषधी वनस्पती, करवंदे, आळू, जांभूळ, आदी रानमेवा विकून आपली गुजराण करीत आहेत. पावसाळ्यात लागण केलेली भातशेती जंगली प्राणी फस्त करीत आहेत. निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडण्यासाठी नेतेमंडळी भेट देतात. अठरा विश्वे दारिद्र्य घेऊन आम्ही जन्माला आलो ही आमची चूक आहे का? आम्हाला नाहीतर आमच्या मुलाबाळांना तरी शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. पाठारचा धनगरवाडा, माणेचा धनगरवाडा, मालाईचा धनगरवाडा या तीन धनगरवाड्यांवर अशी अवस्था आहे.शासनाने आमची दखल घेतली नाही, तर येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकणार.- राया विठू कस्तुरे