शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
4
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
5
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
6
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
7
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
8
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
9
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
10
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
11
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
12
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
13
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
14
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
15
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
16
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
17
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
18
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
19
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
20
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रावर राजकीय नजर, नांदेडला उद्या मेळावा; नेतृत्वाचा शोध

By विश्वास पाटील | Updated: February 4, 2023 11:35 IST

संभाजीराजेही कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे

विश्वास पाटीलकोल्हापूर : भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही सक्षम नेतृत्वाचा शोध त्यांच्याकडून सुरू आहे. माजी खासदार संभाजीराजे यांना त्याच हेतूने चर्चेसाठी हैदराबादला बोलवले होते, असे समजते.मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला मेळावा येत्या रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) नांदेड येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी जनमानसांत स्थान असलेल्या नेत्याचा शोध सुरू आहे. देशाच्या राजकारणात भाजपच्या विरोधात व काँग्रेसला पर्यायी आघाडी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी तेलंगणाच्या सीमेवरील कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रदेश तेलंगणाचा आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री राव यांनी गेल्या आठ वर्षांत एक कोरडवाहू राज्य ते आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले राज्य अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी मुख्यत: शेती, सिंचन या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणून तेथील शेतकऱ्याचे जीवनमान बदलून टाकले आहे. त्यांचे सरकार शेतकऱ्यांना सरसकट एकरी दहा हजार रुपये तोट्याच्या शेतीबद्दल अनुदान देते. त्यामध्ये कोणतेही स्लॅब नाहीत. 

अठरा ते साठ वर्षांपर्यंतचा शेतकरी मृत झाला तर त्याला पाच लाखांचा विमा संरक्षण मिळते. त्याचा हप्ता तेलंगणा सरकार भरते. अशा अनेक योजनांमुळे त्यांनी तेलंगणामध्येही पक्षीय पकड मजबूत केली आहे. शेती, सहकार, साखर कारखानदारीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर, सत्तेवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच शेतीशी आणि चळवळीशी संबंधित नेतृत्वच त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहे.दोन नवे भिडू...प्रस्थापित पक्षांसोबतच आता भारत राष्ट्र समिती व आप हे दोन नवे भिडू महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरू पाहत आहेत. या दोघांत साम्य हे आहे की त्यांनी आपापल्या राज्यात चांगले काम करून दाखविले आहे व तो पॅटर्न घेऊन ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ पाहत आहेत.संभाजीराजे यांची अडचणराव यांच्याकडून महाराष्ट्रातील जनमानसांत स्थान असलेल्या नेत्यांशी संपर्क सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांना त्यांनी भेटीसाठी बोलविले होते. संभाजीराजेही हैदराबादला जाऊन आले आहेत. ते आता कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. राव यांची भाजपला टोकाचा विरोध ही देशपातळीवरील राजकीय दिशा आहे. संभाजीराजे यांची भूमिका मात्र अजूनही भाजपपासून फार लांब जाण्याची किंवा त्या पक्षाला अंगावर घेण्याची दिसत नाही. ही एक अडचण ते एकत्र येण्यात येऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती