शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तालीम, मंडळांनी सामाजिक सलोखा राखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील तालीम, मंडळांनी सामूहिक संस्कृती वाढीला बळ द्यावे. सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले.येथील श्री खंडोबा तालीम मंडळाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, अ‍ॅड. धनंजय पठाडे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील तालीम, मंडळांनी सामूहिक संस्कृती वाढीला बळ द्यावे. सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले.येथील श्री खंडोबा तालीम मंडळाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, अ‍ॅड. धनंजय पठाडे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, तालीम, मंडळांनी त्यांच्या इमारती अद्ययावत कराव्यात. उपनगरातील कॉलन्यांनी आपल्या परिसरात मंदिराची उभारणी अथवा खुल्या जागेत उद्याने विकसित करावीत. विद्यार्थी, तरुणाई, वृद्ध यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. त्यातून सामाजिक सामूहिक संस्कृती वाढवावी. शिवकालीन मर्दानी खेळ टिकविण्याचे महत्त्वपूर्ण काम खंडोबा तालीम करीत आहे. या खेळांच्या प्रसारासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल.खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या तालीम संस्था परंपरेत खंडोबा तालीम मंडळाचे नाव आवर्जून घ्यावे लागते. या तालमीची नूतन वास्तू शिवाजी पेठेला साजेशी झाली आहे. आमदार नरके म्हणाले, नवीन क्रीडा धोरणाच्या राज्यस्तरीय समितीत माझा समावेश आहे. कोल्हापूरमधील विविध क्रीडा संघटनांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठीचे पर्याय या धोरणामध्ये समाविष्ट करण्याचा माझा प्रयत्न राहील.या कार्यक्रमात नूतन वास्तूचे बांधकाम करणारे लक्ष्मण पोवार, संजय इंगळे यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री म्हणाले,आठ खेळाडू यावेळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील इतके टॅलेंट कोल्हापूर जिल्ह्यात आहे.हे टॅलेंट पाहता क्रीडा विकासाला बळकट करण्यासाठी तालीम, मंडळांनी कार्यरत राहावे.समाजाला आनंद देणारे उपक्रम राबविण्यासाठी शासन हॅप्पीनेस मंत्रालय साकारणार आहे.लोकसहभाग, वर्गणीतून खंडोबा तालीम मंडळाने देखणी, सुसज्ज इमारत साकारली आहे. या मंडळाच्या अन्य उपक्रमांना निधी उपलब्ध करून दिला जाईल.